कायदा काय असतो हे नारायण राणेंना कळून चुकलं असेल : वैभव नाईक

| Updated on: Aug 25, 2021 | 9:22 AM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह टीका केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर नाशिक पोलिसांनी अटकेची कारवाई केली. यानंतर शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी यावर प्रतिक्रिया देताना नारायण राणे यांना कायदा काय असतो हे कळून चुकलं असेल असं म्हणत टोला लगावलाय.

कायदा काय असतो हे नारायण राणेंना कळून चुकलं असेल : वैभव नाईक
आगामी विधानसभा निवडणुकीत मालवणमध्ये कोणाची बाजी? वैभव नाईक गड राखणार की राणेंची सरशी !
Follow us on

सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह टीका केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर नाशिक पोलिसांनी अटकेची कारवाई केली. यानंतर शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी यावर प्रतिक्रिया देताना नारायण राणे यांना कायदा काय असतो हे कळून चुकलं असेल असं म्हणत टोला लगावलाय. तसेच नारायण राणे आणि त्यांच्या मुलांनी शिवसेनेची रस्त्यावरची ताकद काय आहे हे अनुभवलं असेल, असंही नमूद केलं.

“शिवसेनेची रस्त्यावरची ताकद नारायण राणे आणि त्यांच्या मुलांनी अनुभवली”

वैभव नाईक म्हणाले, “मी केंद्रीय मंत्री आहे माझं कोणी काही करू शकत नाही अशा अविर्भावात राहणाऱ्या नारायण राणेंना कायदा काय असतो हे कळून चुकले आहे. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे. कायद्याच्या पुढे कोणीही नेता, मंत्री मोठा नाही हे ठाकरे सरकारने दाखवून दिले. शिवसेनेची रस्त्यावरची ताकद नारायण राणे व त्यांच्या मुलांनी आज अनुभवली आहे. यापुढेही ठाकरे सरकारमध्ये कायद्याचे राज्य चालणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.”

“शिवसैनिकांना आव्हान देणाऱ्या नारायण राणेंना अद्दल घडविली”

“गेले कित्येक दिवस शिवसेनेवर बिनबुडाचे आरोप करणाऱ्या, शिवसेनेवर विनाकारण टीका करणाऱ्या, शिवसैनिकांना आव्हान देणाऱ्या नारायण राणेंना आज शिवसैनिकांनी अद्दल घडविली आहे. शांत असलेली शिवसेना वेळप्रसंगी रौद्ररूप धारण करू शकते. यापुढच्या काळातही कोण अंगावर येत असेल तर शिंगावर घेण्याची ताकद संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकांमध्ये आहे. यापुढेही कोण अंगावर आल्यास जशास तसे उत्तर दिले जाणार आहे,” असा इशारा वैभव नाईक यांनी दिला.

हेही वाचा :

उद्धव ठाकरे-अजित पवारांची संमती, सोमवारी रात्रीच ठरलं, नारायण राणेंना अटक करायचं!

Narayan Rane : जामीन मिळताच नारायण राणेंना दुसरा धक्का, नाशिक पोलिसांकडून नोटीस जारी

नको त्या माणसाला सत्तेची दारु पाजली, महाराष्ट्रातून सत्ता गेल्यापासून भाजपवाल्यांची डोकी कामातून गेलीयत, राऊत बरसले

व्हिडीओ पाहा :

Shivsena MLA Vaibhav Naik criticize Narayan Rane for arrest