तीन दिवसांपासून ‘मातोश्री’वर, या दोन इच्छुकांच्या तिकिटाचा निर्णय ठरला

| Updated on: Oct 03, 2019 | 7:43 PM

अशोक पाटील यांच्या जागी रमेश कोरगावकर (Shivsena Ramesh Korgaonkar) यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिली. गेल्या तीन दिवसांपासूनच्या संयमाचं फळ कोरगावकर यांना मिळालं आहे.

तीन दिवसांपासून मातोश्रीवर, या दोन इच्छुकांच्या तिकिटाचा निर्णय ठरला
Follow us on

मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून मातोश्रीवर तळ ठोकून बसलेल्या दोन इच्छुकांच्या (Bhandup West Ashok Patil) तिकिटाचा निर्णय अखेर झाला आहे. भांडुप पश्चिमचे विद्यमान आमदार अशोक पाटील यांचा पत्ता कट (Bhandup West Ashok Patil) झालाय. त्यांच्या जागी रमेश कोरगावकर (Shivsena Ramesh Korgaonkar) यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिली. गेल्या तीन दिवसांपासूनच्या संयमाचं फळ कोरगावकर यांना मिळालं आहे.

उमदेवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी यावर्षी मातोश्रीवर अधिकृत उमेदवारांना पक्षाच्या एबी फॉर्मचे वितरण केले जात आहे. त्यामुळे शिवसेनेतील अनेक इच्छुक मातोश्रीवर येऊन आपले एबी फॉर्म उद्धव ठाकरेंकडून स्वीकारत आहेत. मात्र, भांडुप पश्चिम मतदारसंघात कुणाला उमेदवारी मिळणार याचा पेच अजूनही कायम होता.

भांडुप मतदारसंघातून आपल्यालाच एबी फॉर्म मिळावा म्हणून इच्छुक असलेले विद्यमान आमदार अशोक पाटील आणि महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर मातोश्रीवर तळ ठोकून होते. ते आपल्या उमेदवारीसाठी एबी फॉर्मची वाट पाहात थांबले होते.

भाजपची यादी जाहीर, शिवसेनेकडून एबी फॉर्मचं वाटप

बंडखोरी टाळण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी स्वतः उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप केलं. जाहीरपणे यादी प्रसिद्ध न करता उमेदवारांना बोलवून त्यांनी एबी फॉर्म दिलाय. युतीमध्ये शिवसेना 124 जागा लढवणार आहे. पण इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. काही ठिकाणचा वाद उद्धव ठाकरे यांनी दोन उमेदवारांना समोरासमोर बसवून सोडवला.