उद्धव ठाकरेंच्या हजेरीत शिवसेनेची पंढरपुरात ‘धर्मसभा’

| Updated on: Jul 05, 2019 | 4:48 PM

पंढरपूर : ‘चलो अयोध्ये’चा नारा देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विठ्ठलाच्या दारी पंढरपुरात साधू आणि वारकऱ्यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करणार आहेत. 24 डिसेंबरला सोमवारी पंढरपुरात राज्य परिवहन महामंडळाच्या मालकीच्या या मैदानात ही धर्मसभा भरणार आहे. पंढरपूरमध्ये होणाऱ्या या महासभेकडे सगळ्या राजकीय पक्षांचे लक्ष लागलेलं आहे. शिवसेनेने शक्तिप्रदर्शनासाठी तब्बल 27 एकरावर पसरलेल्या चंद्रभागा मैदानाची निवड केली आहे. […]

उद्धव ठाकरेंच्या हजेरीत शिवसेनेची पंढरपुरात ‘धर्मसभा’
Follow us on

पंढरपूर : ‘चलो अयोध्ये’चा नारा देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विठ्ठलाच्या दारी पंढरपुरात साधू आणि वारकऱ्यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करणार आहेत. 24 डिसेंबरला सोमवारी पंढरपुरात राज्य परिवहन महामंडळाच्या मालकीच्या या मैदानात ही धर्मसभा भरणार आहे. पंढरपूरमध्ये होणाऱ्या या महासभेकडे सगळ्या राजकीय पक्षांचे लक्ष लागलेलं आहे. शिवसेनेने शक्तिप्रदर्शनासाठी तब्बल 27 एकरावर पसरलेल्या चंद्रभागा मैदानाची निवड केली आहे. 5 लाख शिवसैनिक आणि भाविक या धर्मसभेला उपस्थित राहातील असं विश्वास शिवसेनेच्या नेत्यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरे यांच्यासोबत स्टेजवर राज्यभरातील साधू आणि वारकरी संत असणार आहेत.

या महासभेतून पुढच्या राजकीय आखाड्याचे संकेत मिळणार असल्याने या सभेला फारच महत्व प्राप्त झाले आहे. उद्धव ठाकरे सकाळी विठ्ठलाचे दर्शन घेतील. दुपारी 3 ते 5 वाजता सभेआधी बोधले महाराज आणि भास्कर महाराज याचं मार्गदर्शन किर्तन होईल. त्यानंतर 6 ते 7 वाजेदरम्यान उद्धव ठाकरे यांची सभा होईल, यानंतर 6 वाजता चंद्रभागेच्या इस्कॉन घाटावर उद्धव ठाकरे महाआरती करतील.

ही सभा अध्यात्मिक आणि धर्मसभा असल्याने कुठल्याही राजकीय नेत्यांचा यात प्रवेश नसेल, असे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी सांगितले.

80 फूट लांब आणि 60 फूट रुंदीच्या मुख्य स्टेजवर उद्धव ठाकरे त्यांचे कुटुंबीय आणि शिवसेना नेते असणार आहेत. या स्टेजवर राज्यातील साधू आणि वारकरी संतही उपस्थित असतील. या स्टेजसमोर भव्य राममंदिराची रांगोळीही साकारण्यात येणार आहे.