‘हलाल मांस खतरा है, मुसलमान की दाढ़ी खतरा है, मुसलमान की टोपी खतरा है’ असं कोण म्हणालं?

| Updated on: Oct 26, 2022 | 3:52 PM

मुस्लिमांच्या राहणीमानासोबत त्यांच्या खाण्यापिण्यावर नेमका कोणत्या नेत्यानं केलं खळबळजनक वक्तव्य?

हलाल मांस खतरा है, मुसलमान की दाढ़ी खतरा है, मुसलमान की टोपी खतरा है असं कोण म्हणालं?
वादग्रस्त विधानामुळे राजकारण तापणार?
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

कर्नाटक : ‘हलाल मांस खतरा है, मुसलमान की दाढ़ी खतरा है, मुसलमान की टोपी खतरा है’ असं म्हणत भाजपकडून मुस्लिमांना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप AIMIMचे प्रमुख असदुद्दीन औवेसी (Asaduddin Owaisi) यांनी केला आहे. नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी मुस्लिम लोकांच्या राहणीमानासोबत त्यांच्या खाण्यापिण्यावरही केलेली वादग्रस्त वक्तव्य काय होती, हे त्यांनी यावेळी बोलून दाखवलं. मुस्लिमांची (Muslim Community) दाढी, त्यांची टोपी, त्यांचं खाणं-पिणं यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मुस्लिमविरोधी वक्तव्य केलं असल्याचा आरोप औवेसी यांनी केला. यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर तीव्र शब्दांत टीका केली. ते कर्नाटकात पत्रकारांशी बोलत होते.

असदुद्दीन औवेसी यांनी म्हटलं की,…

हे सुद्धा वाचा

हलाल मांस धोकादायक आहे, मुस्लिमांची दाढी धोकादायक आहे, मुस्लिमांची टोपी धोकादायक आहे, मुस्लिमांचं खाणं, पिणं, झोपणं या सगळ्यापासून धोका आहे, अशी वक्तव्य भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आली. मुळाच मुस्लिम ओळख असलेले लोकच भाजपला नको आहेत. भाजप मुस्लिमविरोध आहे.

देशाची राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी सबका साथ सबका विकास असं बोलतात. पण या फक्त बोलायच्या आणि सांगायच्या गोष्टी आहेत. पण वास्तव वेगळंय. ग्राऊंड रियालिटी वेगळी आहे, असाही घणाघाती आरोप त्यांनी यावेळी केला.

मुस्लिमांवर बहिष्कार टाकून भारताच्या विविधतेवरच भाजप हल्ला करतंय. हलालच्या गोष्टी करुन भाजप आपल्या भ्रष्टाचारावर पांघरुण टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचं एमआयएम प्रमुख असदुद्दीन औवेसी यांनी यावेळी म्हटलं.

पाहा व्हिडीओ :

हिजाब घातलेली पीएम

दरम्यान, भारतीय वंशाचे ऋषी सुनक यूकेचे पंतप्रधान झाल्यानं औवेसी यांना एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावर औवेसी यांनी दिलेलं उत्तरही चर्चेत आलं आहे. ‘मला हिजाब घातलेल्या महिलेला देशाचा पंतप्रधान झालेलं पाहायचं आहे’, असं ते म्हणाले. औवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर केलेल्या गंभीर आरोपांमुळे आणि टीकेमुळे आता राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.