राष्ट्रवादीच्या वाटेवर असणाऱ्या एमआयएमच्या तौफिक शेख यांचं नगरसेवक पद रद्द

महापालिकेच्या 6 सभांना सलग गैरहजर राहणाऱ्या एमआयएम नगरसेवक तौफिक शेख यांना न्यायालयाने दणका दिला आहे.

राष्ट्रवादीच्या वाटेवर असणाऱ्या एमआयएमच्या तौफिक शेख यांचं नगरसेवक पद रद्द
| Updated on: Oct 16, 2020 | 6:07 PM

सोलापूर : सहा नगरसेवकांसह राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या तयारीत असणाऱ्या आणि महापालिकेच्या 6 सभांना (MIM Corporator Tofik Shaikh) सलग गैरहजर राहणाऱ्या एमआयएम नगरसेवक तौफिक शेख यांना न्यायालयाने दणका दिला आहे. न्यायालयात दाद मागितलेल्या तौफिक शेख यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे.

प्रभाग क्रमांक 21 चे नगरसेवक तौफिक इस्माईल शेख हे महानगरपालिकेच्या 6 सभांना लागोपाठ गैरहजर राहिल्यामुळे त्यांचे नगरसेवक पद रद्द झाल्याचे मनपा आयुक्तांनी त्यांना नोटीसीने कळवले. त्याला तौफिक शेख यांनी उच्य न्यायालयात दाद मागितली होती.

न्यायालयाने हा खटला सोलापूर न्यायालयात चालवा असा आदेश दिला. त्याचा निकाल महापालिकेच्या बाजूनी लागून एमआयएम नगरसेवक तौफिक शेख यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे. याबाबतची माहिती महापालिकेचे विधिज्ञ श्रीकृष्ण कालेकर यांनी दिली.

MIM Corporator Tofik Shaikh

संबंधित बातम्या :

ओवेसींकडे रिपोर्ट कार्ड, औरंगाबादेत ‘एमआयएम’ दहा विद्यमान नगरसेवकांना डच्चू देणार