शरद पवारांच्या वाढदिवशी विलिनीकरणाचा मुहूर्त? सुनील तटकरेंनी सगळं सांगितलं

शरद पवार- आणि प्रफुल पटेल यांच्या भेटीमध्ये नेमकं काय घडलं? 10 तारखेला नेमकं काय घडणार होतं? याबाबत अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मोठा खुलासा केला आहे. 

शरद पवारांच्या वाढदिवशी विलिनीकरणाचा मुहूर्त? सुनील तटकरेंनी सगळं सांगितलं
| Updated on: Nov 13, 2026 | 4:59 PM

Sunil Tatkare On NCP Merjer:  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाच्या चर्चा काही थांबत नसल्याचं चित्र सध्या दिसत आहे. दोन्ही राष्ट्रवादींकडून विलिनीकरणाच्या चर्चांमध्ये तथ्य नाही असं वारंवार स्पष्ट केले जात आहे. मात्र दोन्ही गटांमध्ये सुरु असलेल्या बैठकांमुळे या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच आता शरद पवार- आणि प्रफुल पटेल यांच्या भेटीमध्ये नेमकं काय घडलं? 10 तारखेला नेमकं काय घडणार होतं? याबाबत अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मोठा खुलासा केला आहे.

काय म्हणाले सुनील तटकरे? 

Loading...

” प्रफुल पटेल आणि माझी नेहमीच चर्चा होते. त्यामध्ये त्यादिवसापासून ते गोंदियाला जाणार आहेत आणि १० तारखेला मुंबईला जाणार आहे, असं त्यांना सांगायंच होते. १० तारखेला गोंदियाहून मी मुंबईला जाणार आहे असं प्रफुल पटेल शरद पवार साहेबांना सांगत आहेत. त्यामुळे यामध्ये शरद पवारांची भेट घेणार आहेत किंवा १० तारीख ठरलेली होती असा अर्थ निघत नाही,” असं सुनील तटकरे म्हणालेत.

शरद पवारांच्या वाढदिवसाला विलिनीकरणाचा मुहूर्त? 

त्याचबरोबर शरद पवार यांच्या वाढदिवसाला म्हणजेच 12 डिसेंबरला विलिनीकरणाचा मुहूर्त आहे, अशा चर्चा माध्यमांमध्ये आहेत. याबाबतही सुनील तटकरेंनी खुलासा केला. “यामध्ये  मला काही तथ्य आहे असं वाटत नाही. शरद पवार साहेब यावर्षी 86 वर्ष पूर्ण करुन 87 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. साहेबांचा वाढदिवस देशातील नजता मोठ्या उत्साहाने साजरा करते. योगायोगाने ती तारीख जवळ आली आहे,  माध्यमांमध्ये सध्या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होत असल्याने तसं बोलले जात आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून माझ्याकडे जी माहिती आहे, त्यानुसार कोणत्याही हालचाली किंवा वेगळी काय चर्चा सुरु आहे असं वाटत नाही,” असं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, “पक्षाची बैठक मंगळवारी झाली. दिवाळीनंतर आमचे पालकमंत्री आणि मंत्री दुष्काळ दौऱ्यावर जाणार आहेत. प्रत्येकाला २- २ जिल्हे जाणार आहेत. हे सलग तीन आठवडे दौरे चालणार आहेत. असं त्या बैठकीत ठरलं. त्यानंतर शेतकऱ्यांना राज्य सरकारची मदत मिळाली आहे का? पंचनामे नीट झालेत का? शेतकऱ्यांच्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत, याचा आढावा घेतला जाणार आहे,” अशी माहितीही तटकरेंनी दिली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us