AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भिकार कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना, सुषमा अंधारे कडाडल्या; ऑडिओ क्लीप प्रकरणानंतर जहरी टीका!

मनोज जरांगेंनी ऐकवलेल्या क्लिपवरुन सुषमा अंधारेंनी यूट्यूबर सुशील कुलकर्णींवर जहरी टीका केलीय. आरोपांनुसार क्लिपमधील संवाद हा भाजप आमदार अतुल भातखळकर, भाजप पदाधिकारी श्वेता शालिनी, यूट्यूबर सुशील कुलकर्णींसह अजून एक अशा चौघांमधला आहे. मात्र चारही जणांनी आरोप फेटाळलेयत.

भिकार कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना, सुषमा अंधारे कडाडल्या; ऑडिओ क्लीप प्रकरणानंतर जहरी टीका!
sushma andhare and sushil kulkarniImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 24, 2026 | 10:03 PM
Share

ब्युरो रिपोर्ट, टीव्ही 9 मराठी : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी काही ऑडिओ क्लीप बाहेर काढल्या आहेत. या ऑडिओ क्लीपमध्ये 500 कोटी रुपये तसेच मनोज जरांगे यांना संपवण्यासाठी षडयंत्र शिजतंय असा आरोप केला जातोय. याच ऑडिओ क्लीपपैकी एका क्लीपमध्ये यूट्यूबर सुशील कुलकर्णी यांचा आवाज असल्याचा आरोप होतोय. त्याच कुलकर्णी यांच्याबाबत शिवसेना (ठाकरे गट) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भलीमोठी फेसबूक पोस्ट लिहित जहरी टीका केली आहे. हे लोक उदयनराजेंनाही मॅनिप्यूलेट करतात का? असा सवाल त्यांनी केलाय. दरम्यान, या साऱ्या प्रकरणावर सुशील कुलकर्णींचा फोन बंद असल्यानं त्यांची बाजू अद्याप कळू शकलेली नाही.

क्लीपमधील आवाज नेमका कुणाचा?

मनोज जरांगेंनी ऐकवलेल्या क्लिपवरुन सुषमा अंधारेंनी यूट्यूबर सुशील कुलकर्णींवर जहरी टीका केलीय. आरोपांनुसार क्लिपमधील संवाद हा भाजप आमदार अतुल भातखळकर, भाजप पदाधिकारी श्वेता शालिनी, यूट्यूबर सुशील कुलकर्णींसह अजून एक अशा चौघांमधला आहे. मात्र चारही जणांनी आरोप फेटाळलेयत. भाजप खासदार उदयराजेंबद्दल क्लिपमध्ये काय आहे यावर सुषमा अंधारेंनी भाष्य केलंय.

उदयनराजेंचीही अवहेलना?

दोन दिवसांपूर्वी अवघ्या दीड मिनिटांचा चंक मी ऐकला होता. आज संपूर्ण 30-32 मिनिटांची ऑडिओ ऐकली. बधीर झाल्यासारखं झालं. उदयनराजेंना सुद्धा आपण मॅनिप्यूलेट करू शकू असं वाटण्याइतकी मजल अत्यंत भिकार मानसिकतेच्या सुशिल कुलकर्णीला वाटते. हा कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना? उदयनराजे किंवा उदयनराजेंचे समर्थक यावर अजिबात व्यक्त होत नाहीत ही कसली अपरिहार्यता? उदयनराजेंची ज्या पद्धतीची प्रतिमा सोशल मीडियावर समर्थकांकडून पुढे केली जाते त्यावरून तर आत्तापर्यंत मराठे सुशील कुलकर्णीचा स्टुडिओ फोडून त्याला व्यवस्थितपणे चोपून काढतील असे वाटत होते, अशी जहरी टीका अंधारे यांनी केलीय.

पट्टा गळ्यात बांधलेला हा कुत्रा स्वतःला…

क्लिपमधील स्वतःच्या नावाच्या उल्लेखावरूनही सुषमा अंधारे यांनी भाष्य केलंय. एखादी स्त्री कुठल्याही हल्ल्याने नामोहरम होत नाही तेव्हा तिच्या चारित्र्यावर हल्ला करणे हा रामबाण इलाज इथल्या पुरुषी मानसिकतेचा असतो. त्यामुळे कुलकर्णी सारख्या हलकट प्रवृत्तींना तसे करणे सोपे वाटते. सुशील कुलकर्णी ने आत्तापर्यंत केलेले अनेक व्हिडिओ जर बघितले तर स्वतःच्या फसलेल्या करिअर बद्दलची भळभळती जखम घेऊन अतिशय टुकार दर्जाच्या पत्रकारितेच्या जीवावर भाजपचा पट्टा गळ्यात बांधलेला हा कुत्रा स्वतःला भाजप प्रवक्त्याचा गुरू म्हणवतो. भाजप प्रवक्तासुद्धा पावाचा तुकडा खात कुलकर्णीजी माझे गुरू आहेत असे अनेकांना बैठकीत सांगतो. थोडक्यात काय तर हे सगळेच आपले लायकी दाखवतात, असा हल्लाबोल अंधारे यांनी केला.

कुलकर्णी आडनावाचे प्रिव्हिलेज…

सुशील कुलकर्णी मुळात सुरुवातीला हा सुशील रेणापूरकर आडनाव लावायचा. पण रेणापूरकर आडनावाने कुलकर्णी आडनावाचे प्रिव्हिलेज आपल्याला मिळू शकणार नाहीत असं वाटल्यावर या महाधूर्त माणसाने रेणापूरकरचे कुलकर्णी करून घेतले. वाढवण बंदर असेल किंवा अनेक प्रकल्पांच्या नावाखाली लोकांना विस्थापित करणे असेल यावर जो जो भूमिका घेईल तो देशविरोधी आहे आणि त्याला अमेरिकेकडून किंवा चायनाकडून फंडिंग मिळते हे नरेटिव्ह आपण रुजवू शकतो त्यासाठी आपण विविध वर्तमानपत्रांना मॅन्युपलेट करू शकतो असं ज्या आत्मविश्वासाने कुलकर्णी सांगतो त्याच्याविरुद्ध वर्तमानपत्रांनी खरतर रान उठवायला हवं होतं कारण हा त्यांच्याही विश्वासार्हतेचा प्रश्न आहे, असेही पुढे सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.

एका प्रचंड मोठ्या उभ्या राहिलेल्या आंदोलनाला…

क्लिपमध्ये जरांगेंविरोधात बोलण्यासाठी टीम तयार करूयात. त्यांना पैसे देववूयात आणि गावोगावी रॅली किंवा कार्यक्रम याबद्दल रणनीती आखली जात आहे, त्यावरही अंधारेंनी टीका केलीय. सुतराम संबंध नसताना जरांगेंचं आंदोलन शरद पवार चालवतात किंवा ठाकरेंचं पाठबळ आहे हे आपण लोकांना पुन्हा पुन्हा सांगूया. वेगवेगळ्या युट्युब चॅनेलवरून ते खोटे पेरत राहूया यावर राजरोसपणे रणनीती आखली जाते. मराठ्यांनो एक गोष्ट लक्षात येते का सुशील कुलकर्णी असेल अतुल भातखळकर, श्वेता शालिनी किंवा अतुल लिमये असेल. ही जी सो कॉल्ड वर्ण श्रेष्ठत्वांने पछाडलेली लोक आहेत, यांना यातून हे सुचित करायचं आहे की, मराठे भलेही शक्तिशाली असतील मात्र ते स्वतःचा मेंदू वापरू शकत नाहीत. आपण त्यांचा मेंदू भ्रमित करू शकतो आणि त्यांच्याच प्रणेत्याच्या विरोधात त्यांना सहज उभं करू शकतो. दुर्दैवाने हे षडयंत्र रचण्यात ते काही अंशी यशस्वीही झाले. एका प्रचंड मोठ्या उभ्या राहिलेल्या आंदोलनाला सुपारीबाज लोक पैसे घेऊन बदनाम करायला पुढे येतात. हे साधारण 30 मिनिटाची ऑडिओ क्लिप ऐकल्यावर लक्षात येते, असेही पुढे अंधारे म्हणाल्या आहेत.

सुशील कुलकर्णींशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण…

तसेच जरांगेंनी पैसे खाल्ले इथपासून जरांगेच्या फार्म हाऊसवर बाया असायच्या इथपर्यंत बोलणाऱ्या बायका या मराठा समाजातून तयार केल्या जातात. कुठे फेडतील हे पाप. ऑडिओ क्लिप खरी आहे हे प्रत्येकाला लक्षात येते. त्यातला आवाज कुणाकुणाचा आहे हेही लक्षात येते. मात्र सत्ताधारी यांच्यासाठी ही ऑडिओ क्लिप खोटी ठरवायला क्षणाचाही वेळ लागणार नाही. तुम्ही मात्र हे षडयंत्र विसरून जायचं की लक्षात ठेवायचं हे तुमचं तुम्ही ठरवायचं,असंही शेवटी अंधारे म्हणाल्या आहेत. दरम्यान, या साऱ्या आरोपांवर आम्ही यूट्यूबर सुशील कुलकर्णींशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा संपर्क होवू शकलेला नाही.

Follow Us
रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा... - सूत्र
Eknath Shinde : रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा; महायुतीतील वादावर पडदा टाकण्याचे प्रयत्न - सूत्र
पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी
Navi Mumbai Water Crisis : पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी
सुशील कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना? अंधारेंचा सवाल
Sushma Andhare : सुशील कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना? अंधारेंचा सवाल
32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा....
Bhaskar Jadhav : 32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा, पुढे म्हणाले....
जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
Shrikant Shinde On Jarange Patil : जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया आली समोर, पुढे म्हणाले...
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया....
Shirkant Shinde On Audio Clip : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; जरांगेंनी सांगितली मराठा..
Manoj Jarange On Maratha : आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; मनोज जरांगेंनी सांगितली मराठा आरक्षण आंदोलनाची रणनीती
या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
Prasad Lad On Viral Audio Clip : या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं...
Aditya Thackeray : ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; जरांगेंचा दावा
Manoj Jarange Patil : मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; मनोज जरांगेंचा मोठा दावा, पुढे म्हणाले...