“माझ्यावर आरोप करणारे वारकरी संप्रदायाचे नव्हे तर मोहन भागवत संप्रदायाचे!”, व्हायरल व्हीडिओवर सुषमा अंधारे यांचं प्रत्युत्तर

'ती' व्हायरल क्लिप भाजपचं षडयंत्र, सुषमा अंधारे यांचे आरोप

माझ्यावर आरोप करणारे वारकरी संप्रदायाचे नव्हे तर मोहन भागवत संप्रदायाचे!, व्हायरल व्हीडिओवर सुषमा अंधारे यांचं प्रत्युत्तर
| Edited By: | Updated on: Dec 25, 2022 | 12:23 PM

पंढरपूर : “माझी क्लिप म्हणजे भाजपचे षडयंत्र खरा वारकरी वाद घालतील, पण अमंगल काही करणार नाहीत. आंदोलन करणारे वारकरी संप्रदायाचे नव्हे तर मोहन भागवत (Mohan Bhagwat) संप्रदायाचे वारकरी आहेत. पंधरा वर्षानंतर ती क्लिप व्हायरल कारण आता काही प्रश्न विचारले जातात त्याचे उत्तर त्यांना देता येत नाहीत”, असं म्हणत सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी त्यांच्या व्हायरल होणाऱ्या व्हीडिओ क्लिपवर प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यपाल हटाव आणि इतर गोष्टींना झाकण्यासाठीचे प्रयत्न टीम देवेंद्रजींकडून सुरू आहेत. त्याचा भाग म्हणून माझी जुनी व्हीडिओ क्लीपचा वापरण्यात आली, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केलेत.

देवेंद्रजींच्या भाषेत मी चार महिन्याचे बाळ असेल आणि चार महिन्यातच त्यांना सळो की पळो करत असेल तर शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटातील शिवसैनिकांच्या मनात किती राग असेल याचा त्यांनी विचार करावा, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदुत्ववादी नाहीत, असं सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं. त्यावरही सुषमा अंधारे बोलल्या. मोदी हिंदुत्ववादी नाहीत हे सुब्रमण्यम स्वामींचं वक्तव्य गांभीर्यपूर्वक आणि विचार करण्यासारखा आहे. कारण स्वामी हे भाजपचे जुने जाणते नेते आहेत, असं त्या म्हणाल्यात.

मोदींच्या अगोदरही भाजपा घडवण्यामध्ये ज्यांनी हयात घालवली त्यामध्ये सुब्रमण्यम स्वामी यांचं नाव आहे.
मोदी यांच्या सत्ता केंद्री विचाराने लालकृष्ण अडवाणी,सुब्रमण्यम स्वामी मागे पडले. त्यामुळे त्यांच्या या विधानाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, असं अंधारे म्हणाल्या आहेत.