‘सुषमा अंधारे तुम्ही तुमचं आडनाव बदलून सुषमा आगलावे करा’ असं कोण म्हणालं?

सुषमा अंधारे यांच्यावर खोचक शब्दांत टीका करणारा नेता नेमका कोण? पाहा व्हिडीओ

सुषमा अंधारे तुम्ही तुमचं आडनाव बदलून सुषमा आगलावे करा असं कोण म्हणालं?
सुषमा अंधारे
Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Nov 17, 2022 | 7:51 AM

मुंबई : सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांना मी विनंती करतो, त्यांनी त्यांचं आडनाव बदलून सुषमा आगलावे करावं, अशा शब्दांत भाजप आमदाराने टीका केली आहे. शिवाय त्यांनी मनिषाताई यांच्याकडे पाहावं आणि त्यांची काय स्थिती झाली, हे समजून घ्यावं, असाही टोला लगावण्यात आलाय. ही टीका केली आहे भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी. ते बुधवारी मुंबईत (Mumbai) पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी हे भाष्य केलं.

सुषमा अंधारे तुमची भाषणं महाराष्ट्र ऐकतोय, असं शेलार यांनी नमूद केलं. गेल्या काही काळात सुषमा अंधारे यांनी केलेल्या वक्तव्यांवरुन आशिष शेलार यांनी सुषमा अंधारे यांच्यावर निशाणा साधला आणि त्यांना आडनाव बदलण्याचा सल्लाही दिला.

पाहा व्हिडीओ : आशिष शेलार यांचा सुषमा अंधारे यांच्यावर हल्लाबोल

स्वतःच्या पक्षाची वाताहत झाल्यानंतर दुसऱ्या पक्षात कलह निर्माण करणं बरं नव्हे, असंही आशिष शेलार यांनी म्हटलंय. सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांना उपनेतेपद देण्यात आलं होतं.

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आपल्या प्रभावी वकृत्वाने सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला होता. सुषमा अंधारे यांनी केलेल्या टीकेला शिंदे गटाकडूनही वेळोवेळी प्रत्युत्तर देण्यात आलं होतं.

बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचं सोनं आज आम्ही लुटल्याचंही त्यांनी म्हटलं. दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला बुधवारी एकनाथ शिंदे यांनी भेट दिली आणि आदरांजली वाहिली. बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येलाच एकनाथ शिंदे यांच्या गटाचा मेळावा पार पडला.

शिवाजी पार्क येथील बाळासाहेबांच्या स्मतिस्थळी शुद्धीकरण करण्यात आलं. यावरुनही शेलारांनी टोला लगावला. एखाद्या स्मृती स्थळावर जाऊन वंदन करणारे मराठी माणूस ते ही मंत्री यांच्या बाबत शुद्धीकरण करण्याचा अशुद्ध विचार कसे काय सुचू शकतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.