आधी सोबतच्यांना शिकवा, मग आम्हाला सांगा, देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

| Updated on: Sep 06, 2021 | 11:14 AM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनचे निर्बंध शिथील करण्याच्या मुद्दयावरून भाजपला फटकारले होते. अनेकांना अनेक गोष्टी उघडण्याची घाई झाली आहे. जरा धीर धरा. राजकारण आपल्या सर्वांचं होतं, पण जीव जनतेचा जातो, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे आणि भाजपला फटकारले होते. त्याला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं.

आधी सोबतच्यांना शिकवा, मग आम्हाला सांगा, देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
Uddhav Thackeray and Devendra Fadnavis
Follow us on

नागपूर : “मुख्यमंत्री काय बोलले याच्यावर मी काहीही बोलणार नाही. समोरच्यांवर बोलण्यापेक्षा आपल्या सोबतच्यांना आणि आपल्या पक्षातल्या लोकांना आधी शिकवावं. मग आम्हाला सांगावं”, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर केला. ते नागपुरात बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनचे निर्बंध शिथील करण्याच्या मुद्दयावरून भाजपला फटकारले होते. अनेकांना अनेक गोष्टी उघडण्याची घाई झाली आहे. जरा धीर धरा. राजकारण आपल्या सर्वांचं होतं, पण जीव जनतेचा जातो, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे आणि भाजपला फटकारले होते. त्याला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं.

समोरच्यांवर बोलण्यापेक्षा आपल्या सोबतच्यांना आणि आपल्या पक्षातल्या लोकांना आधी शिकवावं. मग आम्हाला सांगावं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ही आघाडी सत्तेचे लचके तोडण्यासाठी तयार झाली आहे. प्रत्येक जण सत्तेचे लचके तोडतात. प्रत्येकजण सुभेदार असल्यासारखा वागतोय. प्रत्येक जण लचके तोडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि नाही लचके तोडता आले तर एकमेकांचे लचके तोडा अशाप्रकारची अवस्था या आघाडीची पहायला मिळतेय, असा घणाघात फडणवीस यांनी केला.

देशमुखांच्या लूकआऊट नोटीसची मीडियातून माहिती

दरम्यान, मलाही माध्यमातूनंच कळलं की ईडीने अनिल देशमुखांविरोधात अशाप्रकारची लूकआऊट नोटीस काढली आहे. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय असा सर्व प्रवास झाल्यानंतर आता कायद्याच्या दृष्टीने चौकशीला सामोर जाणं अधिक योग्य होईल. तसाच निर्णय त्यांनी करायला हवा, असा सल्लाही फडणवीसांनी दिला.

करुणा शर्मा प्रकरणात सखोल चौकशी व्हावी

करुणा शर्मा प्रकरणात सखोल चौकशी व्हायला हवी, प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे, त्यापासून वंचित ठेवण्याचं काही कारण नाही. त्याठिकाणी जे काही घडलं त्यावरून कायदा आणि सुव्यवस्था कशाप्रकारे राखली जातेय, हे स्पष्ट होतंय. बंदूक ठेवल्याचा व्हीडीओ, त्यानंतर मिळालेली पिस्टल हा प्रकार गंभीर आहे. याची सखोल चौकशी व्हायला हवी. कुठल्याही दबावाविना याची चौकशी व्हावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

कोविडच्य संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्याच्या उपाययोजनांबाबत कोविड राज्य कृतीदलाने आयोजित केलेल्या “माझा डॉक्टर” या ऑनलाईन परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी राज ठाकरेंसह भाजपलाही फटकारलं. राज्यात अनेकजण घाईने अनेक गोष्टी उघडण्यासाठी आग्रह धरत आहेत. पण ही घाई सर्वसामान्य जनतेच्या अडचणी वाढवणारी आहे. त्यांचे आरोग्य धोक्यात आणणारी तर नाही ना याचा विचार सर्वांनीच करायला हवा. अगदी राजकारण्यांनीही, आम्ही ही हा विचार करायला हवा. राजकारण आपल्या सर्वांचं होतं. पण जीव जनतेचा जातो. जनतेच्या जीवाशी खेळू नका, असं आवाहन त्यांनी सर्व राजकीय पक्षांना केलं. आंदोलन करायचे तर कोरोना विरुद्ध करा, असा टोलाही त्यांनी लगावला.

संबंधित बातम्या  

अनेकांना अनेक गोष्टी उघडण्याची घाई, जरा धीर धरा, राजकारण आपलं होतं, पण जीव जनतेचा जातो; मुख्यमंत्र्यांनी फटकारले