इलेक्शन ड्युटीवरील गडचिरोलीच्या शिक्षकाचा चंद्रपुरात मृत्यू

| Updated on: Oct 21, 2019 | 4:17 PM

45 वर्षीय बापू पांडु गावडे हे निवडणूक कर्तव्यावर पायी जाताना भोवळ येऊन पडले. चंद्रपूरमध्ये रुग्णालयात दाखल केलं असता उपचारादरम्यान गावडे यांचा मृत्यू झाला.

इलेक्शन ड्युटीवरील गडचिरोलीच्या शिक्षकाचा चंद्रपुरात मृत्यू
Follow us on

गडचिरोली : निवडणूक कर्तव्यावरील शिक्षकाचा भोवळ येऊन पडल्यानंतर मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षकाचा चंद्रपुरात उपचारादरम्यान मृत्यू (Teacher on election duty death) झाला.

45 वर्षीय बापू पांडु गावडे हे निवडणूक कर्तव्यावर पायी जात होते. त्यावेळी रक्तस्ताप वाढल्याने ते भोवळ येऊन पडले. चंद्रपूरमध्ये रुग्णालयात दाखल केलं असता उपचारादरम्यान गावडे यांचा मृत्यू झाला.

बापू गावडे यांचा फिट्स आजारामुळे रक्तस्ताप वाढला होता. विधानसभा निवडणुकीसाठी एटापल्ली तालुक्यातील पुरसलगोंदी येथील बुथवर ते तैनात होते. मतदान केंद्र पथक हेडरी बेस कॅम्पवरुन पुरसलगोंदी केंद्राकडे पायी जात असताना गावडे भोवळ येऊन पडले.

डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना एटापल्ली ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना आधी अहेरी आणि तिथून चंद्रपूरला हलवण्यात आले. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू (Teacher on election duty death) झाला.

यापूर्वीही जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या कर्तव्यावरील एक शिक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी (Maharashtra Vidhansabha Election Voting) राज्यातील 288 मतदारसंघांमध्ये एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे, तर येत्या 24 तारखेला (गुरुवार 24 ऑक्टोबर 2019) निवडणुकांचे निकाल हाती येतील. 3 हजार 237 उमेदवारांचं भवितव्य मतदानयंत्रांमध्ये बंदिस्त होणार आहे.

पालघरमधील मतदानकेंद्रावर मतदारांचा बहिष्कार, चार तासात केवळ दोघांचं मतदान

राज्यभरात सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर गडचिरोली जिल्ह्यात नक्षलग्रस्त आणि अतिसंवेदनशील भाग असल्यामुळे सकाळी 7 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंतच मतदान होईल

पक्षनिहाय उमेदवार

बसप – 262
भाजप – 164
काँग्रेस – 147
शिवसेना – 126
राष्ट्रवादी – 121
मनसे – 101
भाकप – 16
माकप – 8
इतर पक्ष – 892
अपक्ष – 1400

एकूण मतदार

• महाराष्ट्रात पुरुष, महिला, तृतीयपंथी, दिव्यांग असे एकूण 8 कोटी 98 लाख 39 हजार 600 मतदार.
•पुरुष मतदार – 4 कोटी 68 लाख 75 हजार 750
•महिला मतदार – 4 कोटी 28 लाख 43 हजार 635
•तृतीयपंथी मतदार – 2 हजार 634

मतदारांचा वयोगट

18 ते 25 – 1,06,76,013
25 ते 40 – 3,13,13,396
40 ते 60 – 3,25,39,026
60 पेक्षा जास्त – 1,51,93,584

मतदान केंद्रे

मतदान केंद्रे – 96 हजार 661
मुख्य मतदान केंद्रे – 95, 473
सहायक मतदान केंद्रे – 1,188
सखी मतदान केंद्रे – 352. महिलांसाठी, महिलांकडून संनियंत्रण आणि व्यवस्थापनावर भर

(Teacher on election duty death)