LIVE ठाण्यात मनसेचा मोर्चा, राज्यभरातील शेतकरी रस्त्यावर

| Updated on: Jul 05, 2019 | 3:37 PM

ठाणे:  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शेतकऱ्यांसाठी ठाण्यात मोर्चाचं आयोजन केलं. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी आंबा उत्पादक शेतकरी आणि आंबा विक्रेत्यांवर केलेल्या कारवाईतून भाजप विरूद्ध मनसे यांच्यात तुंबळ हाणामारी पाहायला मिळाली. याच पार्श्वभूमीवर मनसेने या महामोर्चाचं आयोजन केलं आहे. या महामोर्चाला मोठ्या प्रमाणावर पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दुपारी तीनच्या […]

LIVE ठाण्यात मनसेचा मोर्चा, राज्यभरातील शेतकरी रस्त्यावर
Follow us on

ठाणे:  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शेतकऱ्यांसाठी ठाण्यात मोर्चाचं आयोजन केलं. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी आंबा उत्पादक शेतकरी आणि आंबा विक्रेत्यांवर केलेल्या कारवाईतून भाजप विरूद्ध मनसे यांच्यात तुंबळ हाणामारी पाहायला मिळाली. याच पार्श्वभूमीवर मनसेने या महामोर्चाचं आयोजन केलं आहे. या महामोर्चाला मोठ्या प्रमाणावर पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

दुपारी तीनच्या सुमारास मनसेच्या मोर्चाला ठाण्याच्या गावदेवी मैदान येथून सुरुवात झाली. हजारोच्या संख्येने शेतकरी आणि कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले. ठाणे जिल्हाधिकारी इथे मोर्चा समाप्त होणार आहे.

असंख्य शेतकरी, पदाधिकारी

या महामोर्चासाठी राज्यभरातून अनेक शेतकरी आणि मनसेचे राज्यभरातील पदाधिकारी ठाण्यात दाखल झाले. पालघर, नाशिक, रायगड, कोकण आणि मराठवाड्यातील अनेक पदाधिकारी या मोर्चात दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे शेतकरी आपल्या बैलगाडीसह दाखल झाले आहेत.

शेतकरी आत्महत्याग्रस्त विधवा महिलांचा सहभाग

मनसे शेतकरी महामोर्चासाठी बीड जिल्ह्यातून शेतकरी आत्महत्याग्रस्त विधवा महिलाही आल्या आहेत. जेव्हा आमची परिस्थिती वाईट होती तेव्हा राज ठाकरेंनी मदत केली होती. आम्हाला शिलाई मशिन दिले, रोजगार दिला. त्यामुळे आम्ही आज या मोर्चाला आलो आहोत. राज ठाकरेंवर विश्वास आहे, म्हणून आलो असल्याचं या महिलांनी सांगितलं.

राजकीय रंग

ठाण्यात मनसेन शेतकर्यांसाठी आयोजित केलेल्या महामोर्चात अनेक राजकीय रंग पाहायला मिळत आहेत. यात सर्वात खास म्हणजे सांगलीत ज्या शेतकरी संघटनेच्या उमेदवारासाठी राज ठाकरेंनी सभा घेतली होती, तेथील शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या शेतकरी संघटनेतील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी या मोर्चात आपल्या बिल्ल्यासहीत दाखल झाले. याआधी शहरात आमच्या बाजूने लढणारे कोणीच नव्हतं, मात्र राज ठाकरेंनी शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या भूमिकेचं स्वागत असून, यापुढेही शेतकऱ्यांसाठी कायम रस्त्यावर येत राहू, असं या कार्यकर्त्यांनी सांगितलं.