… तर मुंडेंची आमदारकी नक्की जाईल, अंजली दमानिया यांचा खळबळजनक दावा

वाल्मिकी कराड हा घरगडी होता, महागड्या गाड्या, फ्लॅट, जमिनी, लातूरला १० एकर जागा वाईन शॉपला दिली आहे. त्याला आजा छगन भुजबळ यांच्या सारख्या जेलमध्ये असताना कळा यायच्या तशाच येत असतील असेही अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.

... तर मुंडेंची आमदारकी नक्की जाईल, अंजली दमानिया यांचा खळबळजनक दावा
anjali damania
| Updated on: Jan 24, 2025 | 2:49 PM

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीडमध्ये तळ ठोकला आहे. अंजली दमानिया यांनी सर्वच राजकारण्यांना एकाच माळेचे मणी म्हटले आहे. वाल्मिकी कराड यांचे नाव मोठ्या केसेस मधून वगळण्यात आले आहे. आपण राज्याच्या पोलीस महासंचालक आणि हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींना पत्र लिहीले आहे. कारण या राजकारण्यांवर आपला विश्वास नसल्याचे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. या

आपण ज्या एफआयआरबाबत आपण बोलत होते तो हाच एफआयआर आहे. मी सांगितलं होतं की यावर गंभीर गुन्हे होते. पण चार्जशीटबाबत विचारणा केली तर पुराव्याअभावी नाव वगळली असे सांगण्यात आले, वाल्मिकी आण्णा तिथे नव्हते असं सांगण्यात आले, पुर्ण चौकशी झाली नाही, डीजींकडे पत्र दिले आहे. त्यात ही केस रिओपन करा अशी मागणी आपण केली आहे, ज्याच्यावर हल्ला झाला तोच जेलमध्ये सडत आहे. गुन्हेगारांना पाठीशी घालण्यात येत आहे असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.

वाल्मिकी कराड याचे नाव वगळण्यात आले आहे. पुराव्याअभावी त्याला सोडण्यात आले आहे. काल ऑडीओ क्लिप बाहेर आली आहे. पोलीस अधिकारी बल्लाळ यांचा आवाज असेल तर त्यांची चौकशी व्हावी,सर्व यंत्रणा कराडच्या दिमतीला आहेत असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. ३०२ कोणावर लावायचा हे हेच ठरविणार. कुणाला वाचवायचं हे पण तेच ठरविणार. विष्णु चाटे याला चॉईज ऑफ जेल दिले जाते आहे यातच हे सर्व आले असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.

त्याने तोंड उघडले तर ..

छगन भुजबळ याना तुरूंगात जशी छातीत कळ यायची तशीच आता वाल्मिकी कराडला येत असेल. त्याच्यापोटी मेडीकल ग्राऊंड तयार केला जात आहे. राजकारण्यांना लाज शरम राहीलेली नाही.
महाजेनकोतून आर्थिक लाभ धनंजय मुंडे यांनी घेतला आहे, जर कारवाई झाली तर त्यांची आमदारकी रद्द होईल असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. घरकुल योजना, कृषी पंप घोटाळा अशा अनेक घोटाळ्यांचे धनंजय मुंडे यांच्यावर आरोप आहेत. ८०० रुपयांचा फरक आहे, कित्येक कोटी कमावले आहेत असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.  तृप्ती देसाई काय बोलल्या ? हे मला माहिती नाही पण वाल्मिक कराडचे हात धनंजय मुंडे यांच्यापर्यंत पोहचत असतील तर व्हिडियो कॉन्फरन्सिंग करा, त्याने तोंड ऊघडले तर धनंजय मुंडेंना भोगावं लागेल असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.