Raj Thackeray: राजकारणात वाद असावेत, द्वेष नाही, राज ठाकरेंच्या शस्त्रक्रियेनंतर जितेंद्र आव्हाडांचं ट्विट चर्चेत

| Updated on: Jun 25, 2022 | 12:36 PM

आपल्यावर यशस्वी शस्त्रक्रिया होऊन आपण घरी परतलात. आपण लवकरच पूर्ण पणे बरे व्हालं, ही आई भवानीकडे प्रार्थना. आपण मी कोरोनात असताना माझ्या कन्येकडे आस्थेने विचारपूस केली होती. हे मी विसरलेलो नाही. राजकारणात वाद असावेत द्वेष नाही.

Raj Thackeray: राजकारणात वाद असावेत, द्वेष नाही, राज ठाकरेंच्या शस्त्रक्रियेनंतर जितेंद्र आव्हाडांचं ट्विट चर्चेत
जितेंद्र आव्हाड, राज ठाकरे
Follow us on

मुंबई : मनसे प्रमुख (MNS chief) राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या हीप बोनवर ही शस्त्रक्रिया (surgery) झाली. लीलावती रुग्णालयात राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया 20 जूनला झाली. त्याच्या आधल्या दिवशी राज ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल झाले होते. राज ठाकरे यांनी रुग्णालयातून सुटी झाली. ते घरी गेले आहेत. आज सकाळी जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केलं. ते ट्वीटमध्ये म्हणतात, राज ठाकरे आपल्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. आपण बरे होऊन घरी परतलात. लवकरात लवकर आपण बरे व्हाल, ही आई भवानीकडं प्रार्थना. मी कोरोनात असताना माझ्या कन्येकडं आपण आस्थेने विचारपूस केली होती. हे मी विसरलो नाही. राजकारणात (politics) वाद असावेत द्वेष नाही.

वाचा जितेंद्र आव्हाडांचं ट्विट काय

हे लिहायची गरज आहे का?

या ट्वीटवरून जितेंद्र आव्हाड चर्चेत आले आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी हे ट्वीट केलं. त्यामुळं ते चर्चेत आहेत. बरं वाटलं ऐकूण असं चेतन काळे म्हणताहेत. तर करण माधवी यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. माधवी म्हणतात, राजकारणात वाद असावेत द्वेष नाही, ही गोष्ट लिहायची गरज नाहीय. आपण बाळगायची आणि पुढं जायचं.

मी कोरोनात असताना विचारपूस केली होती

भाजपनं आमच्यावर केवळ द्वेषापायी चौकशांचा ससेमिरा लावला आहे. पण, तेच भाजपसोबत गेले तर ते स्वच्छ होणार आहेत. पण आपल्यात राहिले तर आत टाकतो. ही काय मैत्रिची लक्षणं आहेत का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला. अशा परिस्थितीत जितेंद्र आव्हाडांनी केलेलं ट्वीट चर्चेत आलंय. जितेंद्र आव्हाड ट्वीटमध्ये म्हणतात, आपल्यावर यशस्वी शस्त्रक्रिया होऊन आपण घरी परतलात. आपण लवकरच पूर्ण पणे बरे व्हालं, ही आई भवानीकडे प्रार्थना. आपण मी कोरोनात असताना माझ्या कन्येकडे आस्थेने विचारपूस केली होती. हे मी विसरलेलो नाही. राजकारणात वाद असावेत द्वेष नाही.