हे होऊ शकतात महाराष्ट्राचे यानंतरचे राज्यपाल; पीएम मोदी यांच्यासोबत चांगले संबंध, भाजप कार्यकारिणीत सहभागी

| Updated on: Jan 27, 2023 | 4:00 PM

राज्यात नवीन राज्यपाल येणार असल्याची चर्चा आहे. आर्मीतून रिटायर्ड झालेले कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी आपला पक्ष पंजाब लोक काँग्रेस हा भाजपमध्ये विलीन केला आहे.

हे होऊ शकतात महाराष्ट्राचे यानंतरचे राज्यपाल; पीएम मोदी यांच्यासोबत चांगले संबंध, भाजप कार्यकारिणीत सहभागी
कॅप्टन अमरिंदर सिंह
Follow us on

नवी दिल्ली : पंजाबचे (Punjab) माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह (Amarinder Singh) महाराष्ट्राचे यानंतरचे राज्यपाल होऊ शकतात. भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांनी अमरिंदर सिंह यांच्या नावावर सहमती दर्शवली असल्याची माहिती आहे. कॅप्टन सिंह यांना नवी जबाबदारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Modi ) यांचे कॅप्टन सिंह यांच्याशी चांगले संबंध आहेत. भाजपनं कॅप्टन सिंह यांना ८३ सदस्यीय राष्ट्रीय कार्यकारिणीत सहभागी केले आहे.

कॅप्टन सिंह यांनी राज्यपाल पदाची सुत्रं सोपविण्यात येणार का, यावर पंजाब भाजपचे अध्यक्ष अश्विनी शर्मा यांनी म्हटलं की, याबदद्ल मला काही माहिती नाही. २९ जानेवारीला होणारी पटियाला रॅलीसाठी येणं केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी रद्द केलं.
या रॅलीच्या माध्यमातून पंजाबमध्ये लोकसभा निवडणुकीची भाजपची तयारी सुरू केली जाणार होती. रॅलीची तयारी पूर्ण झाली होती. अशात कॅप्टन सिंह यांना याची जबाबदारी सोवविण्यात आली.

अशी आहे कारकिर्द

अमरिंदर सिंह १९७७ मध्ये पहिल्यांदा काँग्रेसमधून खासदार झाले. १९८४ मध्ये ऑपरेशन ब्ल्यू स्टारनंतर काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. १९९९ मध्ये पु्न्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करून दोनदा मुख्यमंत्री झाले. २०२१ ला मुख्यमंत्री पदावरून हटविल्यानंतर पुन्हा काँग्रेसला रामराम ठोकला.

कोश्यारी यांना हवी आहे राज्यपाल पदापासून मुक्ती

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान मोदी यांच्याजवळ राज्यपाल पदापासून मुक्त करावं, अशी विनंती केली. त्यानंतर राज्यात नवीन राज्यपाल येणार असल्याची चर्चा आहे. आर्मीतून रिटायर्ड झालेले कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी आपला पक्ष पंजाब लोक काँग्रेस हा भाजपमध्ये विलीन केला आहे.

उपराष्ट्रपती पदासाठी सुरू होत नाव

कॅप्टन अमरिंदर सिंह यांचं नाव उपराष्ट्रपती पदासाठी सुरू होतं. नंतर भाजपनं पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांना उमेदवारी घोषित केली. त्यावेळी कॅप्टन सिंह यांच्यावर उपचार सुरू होते.