भास्कर जाधव यांची नाराजी दूर करण्यात उद्धव ठाकरे यशस्वी होणार का?

"निवडणुकीत उमेदवाराला एबी फॉर्म देताना मला विचारात घेण्यात आलं नाही. विधानसभा निवडणुकीत माझ्याकडे विदर्भाची जबाबदारी होती. पण तिथल्या उमेदवारांना एबी फॉर्म दिले हे मला सांगण्यात आलं नाही"

भास्कर जाधव यांची नाराजी दूर करण्यात उद्धव ठाकरे यशस्वी होणार का?
Bhaskar Jadhav
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 26, 2025 | 11:06 AM

उद्धव ठाकरे गटातील शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. भास्कर जाधव कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी भास्कर जाधव यांनी आपण राजकीय सन्यास घेणार असल्याचं सांगितलं होतं. शिवाय त्यांच्या मागील काही प्रतिक्रियांवरुन भास्कर जाधव काहीसे नाराज असल्याचे दिसले होते. मात्र आपण नाराज नसल्याचं माध्यमांना त्यांनी स्पष्टीकरण देताना सांगितलं.

भास्कर जाधव यांनी ठेवलेल्या व्हाट्सअप स्टेटसची सुद्धा चर्चा होत आहे. खरंच भास्कर जाधव नाराज आहेत का? त्यांची नेमकी भूमिका काय आहे ? हे जरी ते माध्यमांसमोर येऊन स्पष्ट करत असले तरी उद्धव ठाकरे यांची या सगळ्या संदर्भात ते भेट घेणार असल्याची माहिती आहे. “आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे कधी कधी आपल्याला त्याची किंमत मोजावी लागते. शिवाय आपल्याला काम करण्याची संधी कमी मिळते, याचं कारण आपण हुजूरी करत नाही” असे भास्कर जाधव यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं.

पक्षातील नेत्यांवर टीका

उद्धव ठाकरे यांच्याशी भास्कर जाधव चर्चा करणार असून उद्धव ठाकरे भास्कर जाधव यांचं म्हणणं जाणून घेणार आहेत. दोन दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी पुन्हा एकदा पक्षावर नाजारी व्यक्त केली. जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुख यांच्या बैठकीत जाधव यांनी नाराजी व्यक्त केली. जाधव यांनी पहिल्या फळीतील नेत्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

एबी फॉर्म कोणी दिले?

“निवडणुकीत उमेदवाराला एबी फॉर्म देताना मला विचारात घेण्यात आलं नाही. विधानसभा निवडणुकीत माझ्याकडे विदर्भाची जबाबदारी होती. पण तिथल्या उमेदवारांना एबी फॉर्म दिले हे मला सांगण्यात आलं नाही. ते कोणी दिले? कसे दिले? याची माझ्याकडे काहीच माहिती नव्हती. ज्या भागाची जबाबदारी आहे तिथल्या गोष्टी मला समजायला हव्यात” असं जाधव यांनी म्हटलं