कोण होणार काँग्रेस अध्यक्ष? उमेदवारी दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस, या 6 नेत्यांमध्ये स्पर्धा

| Updated on: Sep 30, 2022 | 8:29 AM

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे नेमके कोण कोणते नेते स्पर्धेत आहेत? जाणून घ्या!

कोण होणार काँग्रेस अध्यक्ष? उमेदवारी दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस, या 6 नेत्यांमध्ये स्पर्धा
कोण होणार काँग्रेस अध्यक्ष?
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई : काँग्रेस अध्यक्षपदाची (Congress President Election News) माळ कुणाच्या गळ्यात पडते, या प्रक्रियेतील आज महत्त्वाचा दिवस आहे. काँग्रेस (Congress Politics) अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपतेय. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. आज नेमकं कोण कोण आपला उमेदवारी अर्ज दाखल करतं, याकडे संपूर्ण राजकीय (Politics) वर्तुळाचं लक्ष लागलेलंय.

एकूण 6 नेत्यांमध्ये अध्यक्षपदाची स्पर्धा असल्याचं बोललं जातंय. अशोक गेहलोत यांनी अध्यक्षपदाच्या स्पर्धेत माघार घेतल्यानंतर आता नेमकी कुणाकुणाची चर्चा आहे, त्यावर नजर टाकुयात.

  • शशी थरुर
  • दिग्विजय सिंह
  • मल्लिकार्जुन खर्गे
  • कुमारी शैलजा
  • मीरा कुमार
  • मुकुल वासनिक

वरील सहा नावांव्यक्तिरीत् काँग्रेसचे प्रवक्ता पवन खेडा यांच्याही नावाची चर्चा होती. पण त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्याचं वृत्त फेटाळून लावलंय. दरम्यान, जी-23 मधील शशी थरुर यांचं नाव पहिलं घेतलं जातंय. तर दुसरीकडे काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे दिग्विजय सिंह, मल्लिकार्जुन खर्गे आणि कुमारी शैलजा यांच्यामध्येही चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. हे सर्व नेते आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यताय.

हे सुद्धा वाचा

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम

  • आज – अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस
  • 8 ऑक्टोबर – अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस
  • 17 ऑक्टोबर – मतदान
  • 19 ऑक्टोबर – निकाल

अशोक गहलोत हे खरंतर सुरुवातीला काँग्रेस अध्यक्षपदासाठी पात्र उमेदवार समजले जात होते. पण राजस्थानमधील राजकीय सत्तासंघर्षाचा वाद अशोक गहलोत यांना भोवला. काँग्रेस अध्यक्षपदही हवं आणि राजस्थानचं मुख्यमंत्रीपदही हवं, अशी इच्छा असल्यानं अखेर गहलोत यांनी अध्यक्षपदाच्या स्पर्धेतून माघार घेतली. गुरुवारी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली होती.

या राजकीय वाटाघाटीमध्ये गहलोत यांच्यावर असलेला गांधी परिवाराचा विश्वासही कमी झाल्याची चर्चा सुरु झालीय. सध्या त्याचं मुख्यमंत्रीपदही धोक्यात आल्याचं राजकीय जाणकार सांगतात.

अशोक गहलोत यांच्यावरुन सुरु झालेल्या राजकीय उलथापालथीमध्ये दिग्विजय सिंहांनी अध्यक्षपदाच्या शर्यतीत आपणही असल्याचे संकेत दिले. आज दिग्विजय सिंह आपला उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे. पण त्यांनी हायकमांडचं समर्थन आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

दिग्विजय सिंह हे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाले होते. पण अध्यक्षपदाच्या शर्यतीत सहभागी होण्यासाठी माघारी परतले, अशीही चर्चा ऐकायला मिळतेय.

दुसरीकडे जी 23 मधील नेते मुकुल वासनिक यांच्या नावावरुनही चर्चांना उधाण आलंय. एक उच्चस्तरीय बैठकीत त्यांच्या नावाची चर्चाही झाली होती. पण ते स्वतः अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत की नाही, याबाबत संभ्रम आहे.