दहीहंडी उत्सवात गोविंदा दंग, दुसरीकडे पुढारी उधळताहेत राजकीय रंग! चित्रा वाघ, अमोल मिटकरींचं ट्विटर वॉर

| Updated on: Aug 19, 2022 | 4:16 PM

भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांच्या बॅन्ड (Mumbai Police Band) पथकाचा एक व्हिडीओ ट्वीट करुन महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी फडणवीसांच्या एका वक्तव्याचा दाखला देत जोरदार टोला लगावलाय.

दहीहंडी उत्सवात गोविंदा दंग, दुसरीकडे पुढारी उधळताहेत राजकीय रंग! चित्रा वाघ, अमोल मिटकरींचं ट्विटर वॉर
चित्रा वाघ, अमोल मिटकरी
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : एकीकडे राज्यभरात दहिहंडी उत्सवाचा (Dahi handi Festival) जल्लोष आणि उत्साह पाहायला मिळतोय. नेहमीप्रमाणे जवळपास सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलंय. हंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकं ठिकठिकाणी प्रयत्न करताना दिसत आहेत. ‘मच गया शोर सारी नगरी रे’, ‘गोविंदा रे गोपाळा’, ‘गो गो गो गोविंदा’, अशा अनेक गाण्यांच्या तालावर तरुणाई थिरकताना दिसतेय. तर दुसरीकडे राजकीय नेतेमंडळींमध्ये (Political Leader) दहीहंडी उत्सवातच आरोप प्रत्यारोप आणि टीका टिप्पणीही सुरु आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांच्या बॅन्ड (Mumbai Police Band) पथकाचा एक व्हिडीओ ट्वीट करुन महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी फडणवीसांच्या एका वक्तव्याचा दाखला देत जोरदार टोला लगावलाय.

चित्रा वाघ यांचा महाविकास आघाडीला टोला

‘जन्माष्टमी निमित्त मुंबई पोलिसांच्या बँड पथकाने “मच गया शोर सारी नगरी रे” च्या धूनवर जल्लोष केला… महाराष्ट्रात सरकार काय बदललं, सगळा फिका माहोलच बदलला’, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीवर टीका केलीय. दरम्यान, वाघ यांनी ट्वीट केलेल्या व्हिडीओत मुंबई पोलिसांचं बॅन्ड पथक वाजवत असलेलं गाणं नक्कीच आपलं लक्ष वेधून घेत आहे.

अमोल मिटकरींचा फडणवीसांवर निशाणा

तर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही ट्विटरद्वारे फडणवीस आणि शिंदे सरकारवर निशाणा साधलाय. ‘देवेंद्र फडणवीसजी दहीहंडी कार्यक्रमात बोलले “आम्ही मलाई गोरगरीबांपर्यंत पोहचवू”, कदाचित ते सुरत व गुवाहाटी मधे बसुन गलेलठ्ठ मलाई खाऊन टुम झालेल्या 40 गरीब गोविंदांना ठाण्यातुन आणलेल्या मलाईबाबत बोलले असावेत #मलाईदारसरकार’, असा टोला मिटकरी यांनी लगावलाय.