जे माझ्या बारशाला होते, तेच माझ्याविरोधात निवडणूक लढवतायेत : उदयनराजे भोसले

| Updated on: Oct 17, 2019 | 7:00 PM

माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी (Udayanraje Bhosale criticize Opponent) साताऱ्यातील प्रचारसभेत विरोधकांवर जोरदार टीका केली.

जे माझ्या बारशाला होते, तेच माझ्याविरोधात निवडणूक लढवतायेत : उदयनराजे भोसले
Follow us on

सातारा : माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी (Udayanraje Bhosale criticize Opponent) साताऱ्यातील प्रचारसभेत विरोधकांवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जोरदार कौतुक केलं. जे माझ्या बारशाला उपस्थित होते, तेच आज माझ्या विरोधात निवडणूक लढवत आहेत, असं म्हणत त्यांनी विरोधकांना (Udayanraje Bhosale criticize Opponent) टोला लगावला. यानंतर सभेत एकच हशा पिकला. उदयनराजे यांच्या प्रचारासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही (PM Modi in Satara) आज (17 ऑक्टोबर) साताऱ्यातील सैनिक मैदानात लोकसभा पोटनिवडणुकीतील उमेदवार उदयनराजे भोसले आणि सातारा-कराड दक्षिण विधानसभा उमेदवार शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली.

उदयनराजे भोसले म्हणाले, “नरेंद्र मोदींनी सर्वसामान्यांची सत्ता आणली. मोदींना उपमा द्यायची झाली, तर ‘देशाचे आयर्न मॅन’ अशी उपमा द्यावी लागेल. त्यांनी कलम 370 मध्ये बदल करुन जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा हटवला. त्यांनी देशाची सुरक्षा यंत्रणा सक्षम केली.”

‘पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अहंकाराचं हरण होणार’

उदयनराजेंनी विरोधकांवर घणाघाती टीका केली. विरोधक केवळ सत्तेसाठी एकत्र येत असल्याचा आरोपही त्यांनी केला. आगामी निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीच्या अहंकाराचं हरण होईल, असंही उदयनराजेंनी म्हटलं. ते म्हणाले, “पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे, असं सांगितलं जातं. मात्र, या अहंकाराचं लवकरच हरण होणार आहे.”

उदयनराजेंचं हिंदीत भाषण, काँग्रेसने अगर पत्थर को शेंदूर फास दिया…

आपल्या भाषणात उदयनराजेंनी नरेंद्र मोदींना उद्देशून बोलण्यास सुरुवात केल्यानंतर हिंदीत भाषण केलं. यावेळी त्यांच्या हिंदी भाषणात अनेक मराठी शब्दांचीही सरमिसळ ऐकायला मिळाली. ते म्हणाले, “काँग्रेस-राष्ट्रवादी कहते थे की यह हमारा बालेकिल्ला है. यहा कोई घुस नही सकता. लेकिन 40-50 साल इन लोगोने उन्हे आशिर्वाद दिए. ये लोकशाही केल लोगोने उन्हे आशिर्वाद दिए. लेकिन उन्होने सिर्फ राजकारण किया. समाज की ओर उन्होने कभी देखाही नही. उनका अहंकार बढ गया था. वो कहते थे की काँग्रेस पक्षने एक पत्थर भी खडा किया और उसको शेंदूर फास दिया, तोभी यह सारी जनता आकर उन्हे मतदान करेंगी.”

मराठा समाजाच्या मोठ्या नेत्यांनी मराठा आरक्षणाबद्दल एकही शब्द काढलेला नाही, असाही आरोप उदयनराजेंनी केला. यावेळी उदयनराजेंनी पंतप्रधान मोदींकडे शेतकऱ्यांसाठी विमा योजना लागू करण्याची मागणी केली.

साताऱ्यात दोन्ही राजे भाजपमध्ये गेल्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपसह उदयनराजे आणि शिवेंद्रराजे भोसले यांना आव्हान दिलं आहे. ते स्वतः त्यांच्याविरोधात प्रचारसभा घेत आहेत. त्यामुळेच त्यांच्या प्रचारासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींना सभा घ्यावी लागल्याचंही बोललं जात आहे.

उदयनराजेंकडून मोदींचा विशेष स्वागत

उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिवमुद्रा, छत्रपती शिवाजी महाराजांचं शिल्प, साताराची पगडी आणि भवानी मातेच्या तलवारीची प्रतिकृती देऊन स्वागत केले. तसेच 370 कलम रद्द केले म्हणून मोदींना 370 कमळांचा हार देण्यात आला.