ठाकरे पितापुत्रांचं बाळासाहेबांसह नेताजींना अभिवादन! विरोधकांना राऊतांनी राजभवनाच्या गेटवर का थांबायला सांगितलं?

नुकत्याच झालेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या निकालानंतर उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांशी काय संवाद साधतात, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.

ठाकरे पितापुत्रांचं बाळासाहेबांसह नेताजींना अभिवादन! विरोधकांना राऊतांनी राजभवनाच्या गेटवर का थांबायला सांगितलं?
बाळासाहेब आणि नेताजींचा अभिवादन करताना आदित्य आणि उद्धव ठाकरे
| Edited By: | Updated on: Jan 23, 2022 | 2:27 PM

मुंबई : बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि नेताजी सुभाषचंद्र बोस (Netaji Subhashchandra Bose) यांना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांनी अधिवादन केलं. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा अभिवादन करतानाचा फोटोही ट्वीट करत शेअर केला आहे. दरम्यान, संध्याकाळी उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. यावेळी विरोधकांनीही उद्धव ठाकरे काय म्हणतात, हे ऐकावं असं आवाहन संजय राऊत यांनी ट्वीट करत केलंय. विरोधकांनी राजधवनाच्या मुख्य दारात थांबून उद्धवजींचे भाषण ऐकावे, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टोला लगावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन केलं. दरम्यान, या महत्त्वाच्या दिवशी शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांशी संवाद साधणार असल्याची माहितीही संजय राऊत यांनी दिली आहे.

संजय राऊत यांचं ट्वीट

ट्वीट करत संजय राऊत यांनी म्हटलंय की,…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांनी आज वर्षा निवासस्थानी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन केले..
आज संध्याकाळी उद्धवजी शिवसैनकांशी संवाद साधतील.
आजचा दिवस महत्त्वाचा आहे.
विरोधकांनी राजभवनाच्या
मुख्य दारात थांबून उद्धवजीचे भाषण ऐकावे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 96 वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज सकाळीच एक फोटो अपलोड केला होता. या फोटोमध्ये बालपणीचे आदित्य ठाकरे दिसत आहेत. तर त्यांच्या मागे बाळासाहेब ठाकरे उभे असल्याचं दिसतंय. आदित्य ठाकरे यांनी हा खास फोटो सोशल मीडियावर अपलोड करुन बाळासाहेबांना अभिवादन केलंय.

उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष

नुकत्याच झालेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या निकालानंतर उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांशी काय संवाद साधतात, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. आगामी निवडणुकीसोबत राज्यातील कोरोना रुग्णसंख्या आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर उद्धव ठाकरे महत्त्वपूर्ण वक्तव्य करण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगानं रविवारी संध्याकाळी शिवसैनिकांशी ते संवाध साधत असताना, नेमकी काय भूमिका मांडतात, याला महत्त्व प्राप्त झालं आहे.

संबंधित बातम्या :

Balasaheb Thackeray | उभ्या महाराष्ट्रावर गारूड करणारा बाळासाहेब नावाचा झंझावात…!

महाराष्ट्राचा वाघ, मराठी अस्मिता जपणारा झुंजार नेता, पाहा बाळासाहेब ठाकरेंचे दुर्मिळ फोटो