Marathi News » Photo gallery » Political photos » Shivsena leader balasaheb thackeray birth anniversary celebration see unsean and rare photo of balasaheb thackeray
Balasaheb Thackeray Photo | महाराष्ट्राचा वाघ, मराठी अस्मिता जपणारा झुंजार नेता, पाहा बाळासाहेब ठाकरेंचे दुर्मिळ फोटो
बाळासाहेब ठाकरे फक्त राजकारणी होते असं नव्हे. तर ते एक उत्तम वक्ता, व्यंगचित्रकार, संपादक तसेच कलेची जाण आणि आदर ठेवणारे व्यक्तीमत्व होते.
मुंबई : 23 जानेवारी हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस. महाराष्ट्रभर वेगवेगळे सामाजिक उपक्रम, कार्यक्रमांचे आयोजन करुन बाळासाहेबांना अभिवादन केले जाते. पर्यटनमंत्री तथा बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आदित्य ठाकरे यांनी आपल्या आजोबांसोबतचा वरील खास फोटो अपलोड करुन बाळासाहेबांना अभिवादन केले आहे.
1 / 6
बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व आणि महाराष्ट्राचं हीत जपण्यासाठीच राजकारण केलं. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण असं त्यांचं सूत्र होतं.
2 / 6
बाळासाहेबांचा एक इशारा म्हणजे महाराष्ट्रातील शिवसैनिकांसाठी ती आज्ञाच असे. फक्त महाराष्ट्रच नव्हे तर देशभरात बाळासाहेबांची ख्याती होती. दिल्लीचे बडे नेते बाळासाहेबांचे चांगले मित्र होते.
3 / 6
शिवसेना स्थापन झाल्यानंतर बघता बघता हे संघटन संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचले होते. त्यानंतर तत्कालीन प्रमुख पक्षांनादेखील बाळासाहेबांना विचारात घेऊनच आपले राजकीय डावपेच आखावे लागत. सध्या तर महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री आहे.
4 / 6
बाळासाहेब ठाकरे फक्त राजकारणी होते असं नव्हे. तर ते एक उत्तम वक्ता, व्यंगचित्रकार, संपादक तसेच कलेची जाण आणि आदर ठेवणारे व्यक्तीमत्व होते.
5 / 6
शिवसेनेला वाढवण्यासाठी, तिच्या शाखा गाव खेड्यात पोहोचवण्यासाठी बाळासाहेबांनी अपार कष्ट घेतले. त्यांनी लाखोंच्या सभा गाजवल्या. त्यांच्या सभेला लोकांची प्रचंड गर्दी असे