‘मोदी तुम्ही तुमचा आत्मा सैतानाला विकला का?’; उद्धव ठाकरे कडाडले, पंतप्रधानांवर सडकून टीका

उद्धव ठाकरे यांची आज छत्रपती संभाजीनगर येथे सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत त्यांनी मोदींवर निशाणा साधला. "अहो आज सकाळी पवारांना डोळा मारला की, या आमच्याकडे. एका ठिकाणी बोलायचं की ही नकली शिवसेना आहे. एका ठिकाणी बोलायचं ही नकली राष्ट्रवादी आहे. मग म्हणायचं आजा मेरी गाडी में बैठ जा. हे एवढे घाबरले आहेत", अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

'मोदी तुम्ही तुमचा आत्मा सैतानाला विकला का?'; उद्धव ठाकरे कडाडले, पंतप्रधानांवर सडकून टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: May 10, 2024 | 9:23 PM

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. “मोदीजी तुम्ही 2014 साली तुम्ही पंतप्रधान व्हावे, या पत्रावर माझी सही घेतली होती. 2019 मध्ये देखील सही घेतली होती. पण तुम्ही काल जे बोललात त्यामुळे मी तुम्हाला क्षमा करु शकत नाही. तुम्ही माझ्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणालात. एवढंच नाही तर तुम्ही मला बाळासाहेबांचा नकली संतान म्हणालात. नकली संतान? अहो तुम्ही तुमचा आत्मा सैतानाला विकला का? मग कशाला ही थेरं करत आहात? बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटत असेल? 2014 साली ज्यादिवशी मी माझ्या तुळजाभवानीचं दर्शन घेऊन मुंबईत गेलो त्याचदिवशी तुम्ही एकनाथ खडसे यांनी फोन करुन युती तुटली सांगायला लावली, मग तेव्हा बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटलं असेल?”, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला. उद्धव ठाकरे यांची आज छत्रपती संभाजीनगर येथे सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत त्यांनी मोदींवर निशाणा साधला.

“उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे सांगतात की, मोदींच्या इंजिनाला विकासाचे डब्बे आहेत. अहो विकासाचे डब्बे सोडून द्या. आम्ही गेली 10 वर्ष पाहतोय, तुमच्या इंजिनला केवळ डब्बेच लागत आहेत. पण तुमच्या डब्ब्यांना खाली भ्रष्टाचाराची चाके आहेत ना. त्याचं काय करताय तुम्ही? संपूर्ण देशाने ठरवलं आहे की, आता हे इंजिनच नको. गुजरातला पाठवून द्या. ज्या वाटेने तुम्ही आमचे गद्दार नेले त्याच वाटेने मोदीजींचे इंजिनही गुजरातला पाठवून द्या. कारण गेली 10 वर्ष नुकसत्या वाफा नाही तर थापा मारत आहेत”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

‘मोदींनी आज पवारांना डोळा मारला’

“मोदीजी तुम्ही जी भाषा वापरत आहात ती तुम्हाला शोभत नाही. माझ्या महाराष्ट्रात ही भाषा तर चालूच शकत नाही. कारण हा मराठवाडा साधुसंतांचा आहे. एकमेकांचा आदर करणारा आहे. पंढरपुराच्या वारीमध्ये फुगड्या खेळल्यानंतर एकमेकांच्या पाया पडून आशीर्वाद घेण्याची शुभेच्छा देण्याची प्रथा परंपरा महाराष्ट्रात आहे. तुम्हाला काय करायचं आहे ते नेमकं ठरवा. आजपर्यंत तुम्ही सगळं फोडलंत. शिवसेना, राष्ट्रवादी फोडली, तरीदेखील कधी मला डोळा मार तर कधी शरद पवार यांना डोळा मार”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“अहो आज सकाळी पवारांना डोळा मारला की, या आमच्याकडे. एका ठिकाणी बोलायचं की ही नकली शिवसेना आहे. एका ठिकाणी बोलायचं ही नकली राष्ट्रवादी आहे. मग म्हणायचं आजा मेरी गाडी में बैठ जा. हे एवढे घाबरले आहेत, कारण त्यांना कळून चुकलं आहे की, ते आता परत दिल्ली बघत नाहीत. महाराष्ट्र त्यांना दिल्ली बघू देणारही नाही”, असा दावा उद्धव ठाकरेंनी केला.

Non Stop LIVE Update
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात.
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?.
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं.
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले.
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?.
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात...
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात....
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान.
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला.
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ.