UP Election Survey : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत मोठा उलटफेर? ओपिनियन पोलने फोडला भाजपला घाम

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या ओपिनियन पोलनुसार, भाजपला तिसऱ्यांदा सत्ता मिळण्याची शक्यता आहे. मात्र, समाजवादी पक्ष आणि काँग्रेस एकत्र आल्यास परिस्थिती पूर्णपणे बदलेल. या आघाडीला स्पष्ट बहुमत मिळून अखिलेश यादव मुख्यमंत्री होऊ शकतात. त्यामुळे भाजपच्या विजयाची गणिते बिघडतील, असा धक्कादायक सर्व्हे समोर आला आहे.

UP Election Survey : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत मोठा उलटफेर? ओपिनियन पोलने फोडला भाजपला घाम
Akhilesh Yadav
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 26, 2026 | 11:41 AM

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा एक ओपिनियन पोल समोर आला आहे. या ओपिनियन पोलनुसार राज्यात भाजपची तिसऱ्यांदा सत्ता येण्याची शक्यता आहे. मात्र, समाजवादी पार्टी आणि काँग्रेसने एकत्र निवडणूक लढल्यास राज्यात अखिलेश यादव मुख्यमंत्री होण्याचे चान्सेस अधिक आहे. त्यामुळे भाजपचा खेळ बिघडू शकतो, असा धक्कादायक सर्व्हे समोर आला आहे. ‘स्कोर इंटेलिजेंस’ (SCORE Intelligence) एजन्सीने 15 ऑक्टोबर ते 23 नोव्हेंबर 2026 दरम्यान 91,429 मतदारांचा कल जाणून घेतला. त्यामधून उत्तर प्रदेशात मोठा उलटफेर होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. भाजपा आणि समाजवादी पार्टी आघाडीत उत्तर प्रदेशात कांटे की टक्कर होताना पाहायाला मिळत आहे.

समाजवादी पार्टी आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपावरून तणातणी सुरू असतानचा हा सर्व्हे आला आहे. मात्र, विरोधकांनी निवडणुकीत एकजूट दाखवली तर भाजपला सत्तेतून बाहेर जावं लागणार असल्याचं हा सर्व्हे सांगतो. मात्र, समाजवादी पार्टी आणि काँग्रेसने वेगळ्या चुली मांडल्या तर भाजपला तिसऱ्यांदा राज्यात सत्ता बनवण्याची संधी मिळू शकते. काँग्रेस आणि समाजवादी पार्टी एकत्र आल्यास त्यांना बहुमत मिळेल असं या सर्व्हेतून स्पष्ट झालं असून भाजपसाठी धोक्याची घंटी असल्याचं सांगितलं जात आहे.

Loading...

जागांचं गणित काय सांगतं?

उत्तर प्रदेश विधानसभेत 403 सदस्य आहे. बहुमतासाठी 202 जागांची आवश्यकता आहे. सर्व्हेनुसार भाजपला 177 ते 215 जागा मिळण्याची शक्यता आहे. जर काँग्रेस आणि समाजवादी पार्टीत आघाडी नाही झाली तर समाजवादी पार्टीला 160 ते 202 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला अवघ्या दोन जागा मिळण्याची शक्यता आहे. जयंत चौधरी यांच्या राष्ट्रीय लोक दलाला 10 जागा मिळणार आहे. तर अनुप्रिया पटेल यांच्या अपना दल (सोनेलाल) ला पाच जागा मिळण्याची शक्यता आहे. ओपी राजभर यांच्या सुभासपाला 3 ते 5 जागा मिळण्याची शक्यता आहे. संजय निषाद यांच्या निषाद पार्टीला तीन जागा तर राजभैय्या यांच्या जनसत्ता दल लोकतांत्रिकला अवघ्या दोन जागा मिळण्याची शक्यता आहे. मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीला अवघी एक जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आघाडीने खेळ बदलणार?

या सर्व्हेनुसार, काँग्रेस आणि समाजवादी पार्टीने एकत्र निवडणूक लढवली तर या आघाडीला 174 ते 219 जागा मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे ही आघाडी 202 हा बहुमताचा आकडा सहज पार करणार आहे. दुसरीकडे भाजपच्या नेतृत्त्वातील एनडीएला 181 ते 226 जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि समाजवादी पार्टीच्या आघाडीवर उत्तर प्रदेशचं गणित अवलंबून आहे. त्यावरूनच योगी आदित्यनाथ सत्तेत राहणार की जाणार? हे ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us