Video : राज ठाकरेंसह भोगी, योगी आणि सगळ्यांवर हल्लाबोल! दिपाली सय्यद यांचं टीकास्त्र

| Updated on: May 03, 2022 | 8:26 AM

राज्यात सर्वकाही बरखास्त होऊन राष्ट्रपती राजवट लागावी यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत. ही राष्ट्रपती राजवट लागू व्हावी म्हणून कुठल्याही पातळीला जाऊन अशा प्रकारच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप सय्यद यांनी केला आहे.

Video : राज ठाकरेंसह भोगी, योगी आणि सगळ्यांवर हल्लाबोल! दिपाली सय्यद यांचं टीकास्त्र
दिपाली सय्यद
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई – राज ठाकरे (Raj Thackeray) यांची औरंगाबाद (Aurangabad) येथील भव्य सभा पार पडली. यावेळी राज ठाकरे हे भोंग्यांच्या मुद्द्यावर ठाम असल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र यावेळी राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर टीका करत शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी ‘जे होईल ते होईल’ म्हणजे दंगली झाल्या तरी चालतील असं म्हटलं आहे. सभेसाठी गेलेल्या गाड्यांच्या ताफ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याकडे ढुंकून न बघणारे साहेब…जर दंगली झाल्या तर प्रेत तरी बघायला येतील का? असा सवाल यावेळी सय्यद यांनी उपस्थित केला. दंगली झाल्या तर त्यात नुकसान फक्त सर्वसामान्य हिंदू आणि मुस्लिमांचं होणार असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या. जर असं काही घडलं तर अमित ठाकरे जातील फॉरेनला आणि इथे फक्त श्रद्धांजलीचे बोर्ड लागतील अशी घणाघाती टीका शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद (Dipali Sayyed) यांनी केली आहे.

देवाला आपण आज राजकारणातला एक मुद्दा बनवला आहे

राज्यात सर्वकाही बरखास्त होऊन राष्ट्रपती राजवट लागावी यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत. ही राष्ट्रपती राजवट लागू व्हावी म्हणून कुठल्याही पातळीला जाऊन अशा प्रकारच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप सय्यद यांनी केला आहे. महागाई सारखे अनेक विषय असताना ते विषय सोडून राष्ट्रपती राजवट आणण्यासाठी तुम्ही जातीपातीच युद्ध करत आहात. त्यात लोकांना अडकवून हरवून ठेवलं असल्याचं सय्यद म्हणाल्या. आपण आपल्या देवांना कुठे नेऊन ठेवलं आहे. देवाला आपण आज राजकारणातला एक मुद्दा बनवला आहे. हे राजकारण आहे का ? एकाठिकाणी भोंगा एका ठिकाणी हनुमान चालीसा हे सगळ पाहून वाईट वाटत असल्याचे सांगत सय्यद यांनी खंत व्यक्त केली आहे. सगळीकडे शांती कायम राहायला पाहिजे. कारण या भोंगे आणि हनुमान चालीसाच्या भांडणात मोठी लोक मोठीच राहतील पण श्रद्धांजलीचे फोटो तुमचे लागतील असे आवाहन देखील यावेळी दिपाली सय्यद यांनी केले आहे.

फडणवीस तर पळताना दिसले होते

बाबरी मस्जिदवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा कुठे लपून बसले होते. फडणवीस तर पळताना दिसले होते. त्यामुळे बाबरी मस्जिदच्या वेळी फक्त हिंदू आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उपस्थित होते. त्याच्या पलीकडे कोणी उपस्थित नव्हते. तसेच यावेळी बोलताना दिपाली सय्यद यांनी अमृता फडणवीस यांचा देखील खरपूस समाचार घेतला. अमृता फडणवीस आता माजी मुख्यमंत्री झालेले आहेत. त्यांचे सगळे व्यवसाय बंद झाले आहे. त्यामुळे दुसऱ्यांकडे किती पैसे आहेत याकडे ढुंकून बघण्याची गरज नाही. त्यांनी न बोललेलंच बर त्यांना जर पुन्हा यायचं असेल तर त्यांनी त्याचं तोंड बंद ठेवाव असा टोला सय्यद यांनी अमृता फडणवीस यांना लगावला आहे.

हे सुद्धा वाचा