Kirit Somaiya | ‘विमल अग्रवाल यशवंत जाधवांसाठी काम करत होते’

यशवंत जाधव हे शिवसेनेचा राइट हँड आहेत. मुंबई महापालिकेचे पाच वर्ष स्थायी समितीचे अध्यक्ष असताना जाधव यांनी एक हजार कोटी रुपयांच्या आसपास माया जमवली आहे, असा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता.

सिद्धी बोबडे

| Edited By: सिद्धेश सावंत

May 25, 2022 | 2:42 PM

यशवंत जाधव यांनी काळा पैसा पांढरा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. ते म्हणाले, ‘यशवंत जाधव यांनी प्रधान डीलर्सच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून सगळा काळा पैसा पांढरा केला आहे. 1 रुपयाचा शेअर थेट 500 रुपये होतो आणि सगळा काळा पैसा हा पांढरा केला जातो, असा हा प्रकार आहे. हा सगळा पैसा जाधव यांनी आखाती देशात गुंतवल्याचंही सोमय्यांनी सांगितलं. याच संदर्भात यशवंत जाधवांना नोटीस पाठवण्यात आली आहे.संजय राऊत हे काहीही बोलतात. ते हास्यास्पद आहेत. त्यांनी स्टॅलिन आणि राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांसंदर्भात नंतर बोलावं आघी मनसुख हिरेनसंदर्भात स्पष्टीकरण द्यावं, असं वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केलं आहे. मनसुख हिरेन यांना मारण्यासाठी प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे यांची नियुक्ती करण्यात आली होती.. असा आरोप सोमय्यांनी केला आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें