व्हायरल वास्तव : सलग चारवेळा जिंकलेले काँग्रेस आमदार भाजपमध्ये?

| Updated on: May 26, 2019 | 11:20 AM

वर्धा : नुकतेच लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निकालात काँग्रेस पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. याच दरम्यान वर्धा जिल्ह्यातील देवळी विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांच्याबाबत खोडसाळ मेसेज तयार करुन सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहेत. आमदार रणजित कांबळे भाजपमध्ये जाणार असल्याचा खोटा संदेश वृत्त वाहिन्यांचे बॅनर वापरत फोटो मॉर्फ करण्यात आलेत. […]

व्हायरल वास्तव : सलग चारवेळा जिंकलेले काँग्रेस आमदार भाजपमध्ये?
Follow us on

वर्धा : नुकतेच लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निकालात काँग्रेस पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. याच दरम्यान वर्धा जिल्ह्यातील देवळी विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांच्याबाबत खोडसाळ मेसेज तयार करुन सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहेत. आमदार रणजित कांबळे भाजपमध्ये जाणार असल्याचा खोटा संदेश वृत्त वाहिन्यांचे बॅनर वापरत फोटो मॉर्फ करण्यात आलेत. हा खोडसाळपणा करणाऱ्याविरोधात आमदार कांबळे यांच्यातर्फे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांनी शहर पोलिसांत तक्रारीवरुन अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

येत्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता हा खोडसाळपणा केल्याचे बोलले जात आहे. लोकसभेचे निकाल लागून दोन दिवस होत नाही तेच अनेकांना विधानसभेचे वेध लागले आहे. यातून मागील सलग चारदा विजयी राहिलेले विशेष म्हणजे 2014 मोदी लाटेत सुद्धा निवडणूक आलेले रणजित कांबळे हे टार्गेट होतांना दिसून येत आहे. यात सकाळपासून जाणीवपूर्वक दोन वृत्त वाहिन्यांचा नावाचा उपयोग फिरवले जात आहे.

आमदार रणजित कांबळे लवकरच करणार भाजपात प्रवेश असा उल्लेख करत बदनामी आणि खोडसाळपणा करण्यात आला. यावर संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळाल्यात. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांनी शहर ठाण्यात तक्रार दिली.

आमदार रणजित कांबळेंची पोस्ट तयार करुन बदनामी करणाऱ्याचा शोध घेण्याची मागणी काँग्रेस जिल्हाध्यक्षांकडून करण्यात आली आहे. सायबर अंतर्गत गुन्हा दाखल करुन योग्य ती कारवाई करावी. जेणेकरुन हा खोडसाळपणा पुन्हा होणार नाही. यामुळे अनेक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या भावना दुखवल्याने संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहे.