Asaduddin Owaisi : तुमच्या दडपशाहीला आम्ही घाबरत नाही म्हणत ओवेसी कडाडले; अन् ओवेसी रडले

| Updated on: Apr 29, 2022 | 10:57 PM

रामनवमीच्या दिवशी झालेल्या हिंसाचाराबद्दल त्यांनी सोशल मीडियावर सातत्याने ट्विटही केले होते. त्यांच्या दृष्टीने केवळ एका विशिष्ट समाजावर बुलडोझरची कारवाई केली जात आहे. पोलीस कारवाई केवळ एका समाजावर होत आहे. याला त्यांनी भाजपची फुटीर रणनीती असल्याचे म्हटले आहे.

Asaduddin Owaisi : तुमच्या दडपशाहीला आम्ही घाबरत नाही म्हणत ओवेसी कडाडले; अन् ओवेसी रडले
एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी
Image Credit source: tv9
Follow us on

हैदराबाद : सध्या मशिद, भोंगा (Bhonga) आणि हनुमान चालिसा हे वाद देखील गाजत आहेत. त्यातच अनेक ठिकाणी मुस्लिमांवर अत्याचार झाल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. त्याचवेळी एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी हैदराबादमध्ये नमाजानंतर लोकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुस्लिमांवर वाढत्या अत्याचाराबाबत दु:ख व्यक्त केलं. त्याचवेळी ते भावूक झाले आणि भाषणादरम्यान त्यांना रडू कोसळलं. त्यावेळी ते म्हणाले खरगोनमध्ये मुस्लिमांची (Muslim) घरे उद्ध्वस्त झाली, जहांगीरपुरीमध्ये हिंसाचार झाला. पण आम्ही मैदान सोडणार नाहीत, अशी ओरड त्यांनी केली. त्यांना मृत्यूची भीतीही वाटत नाही.देशात एका समुदायाला लक्ष्य केले जात असल्याचा आरोप ओवेसी यांनी केला. त्याच्या डोळ्यादेखत अशा अनेक घटना घडल्या आहेत, ज्यात थेट एखाद्या धर्मावर कारवाई झाली. ते म्हणाले की, हिंमत हारू नका, तुम्हीही ऐका, मी या मृत्यूला घाबरत नाही. तुमच्या अत्याचारालाही आम्ही घाबरणार नाही. तुमचे सरकारही आम्हाला घाबरवू शकत नाही. आम्ही धीर धरू, पण मैदान सोडणार नाही.

आम्ही धैर्यवान आहोत

तर, भाषणादरम्यान अनेक वेळा ओवेसींचे डोळे ओले झाले होते. अल्पसंख्याकांवरील कारवाईमुळे ते संतप्त झाले होते. ते म्हणाले की, आम्ही अल्लाहच्या मार्गावर चालणारे आहोत. आम्ही धैर्यवान आहोत. त्यांच्या मते मुस्लीम समाजाकडे केवळ विश्वासाची संपत्ती आहे, अशा परिस्थितीत अल्लाह त्यांच्यासाठी मार्ग खुला करेल. कोणालाही निराश होण्याची गरज नाही, चढ-उतार हे येतच असतात. परंतु प्रत्येक आव्हानाला खंबीरपणे सामोरे जावे लागेल.

हे सुद्धा वाचा

भाजपची फुटीर रणनीती

याआधीही ओवेसी यांनी अनेक प्रसंगी प्रक्षोभक भाषणे दिली आहेत. रामनवमीच्या दिवशी झालेल्या हिंसाचाराबद्दल त्यांनी सोशल मीडियावर सातत्याने ट्विटही केले होते. त्यांच्या दृष्टीने केवळ एका विशिष्ट समाजावर बुलडोझरची कारवाई केली जात आहे. पोलीस कारवाई केवळ एका समाजावर होत आहे. याला त्यांनी भाजपची फुटीर रणनीती असल्याचे म्हटले आहे.