बारामतीही आम्हीच जिंकणार, चंद्रकांत पाटलांचा दावा

पुणे : बारामतीसह पश्चिम महाराष्ट्रातील सर्व 10 जागा आम्हीच जिंकणार असल्याचा दावा सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ते टीव्ही 9 मराठीशी खास बातचीत करत होते. पश्चिम महाराष्ट्रातील त्या प्रत्येक ठिकाणी आपण स्वतः उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जात असल्याचेही यावेळी त्यांनी नमूद केले. मोदींकडे देशाच्या विकासाच्या मुद्दे असल्याचे सांगत चंद्रकांत पाटलांनी सुप्रिया सुळे यांच्या […]

बारामतीही आम्हीच जिंकणार, चंद्रकांत पाटलांचा दावा
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:07 PM

पुणे : बारामतीसह पश्चिम महाराष्ट्रातील सर्व 10 जागा आम्हीच जिंकणार असल्याचा दावा सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ते टीव्ही 9 मराठीशी खास बातचीत करत होते. पश्चिम महाराष्ट्रातील त्या प्रत्येक ठिकाणी आपण स्वतः उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जात असल्याचेही यावेळी त्यांनी नमूद केले.

मोदींकडे देशाच्या विकासाच्या मुद्दे असल्याचे सांगत चंद्रकांत पाटलांनी सुप्रिया सुळे यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी वर्धा येथील आपल्या प्रचार सभेत थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना लक्ष्य केले होते. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही मोदींवर टीका करत व्यक्तिगत टीका करण्याऐवजी मोदींनी देशातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलावे ,असे सडेतोड उत्तर दिले होते. तसेच पवारांवर टीका केल्याशिवाय बातमी होत नाही हे मोदींना माहिती असल्यानेच त्यांनी तशी टीका केल्याचा चिमटाही सुळे यांनी काढला.

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांनाही लक्ष्य केले. अजित पवारांच्या जलसिंचन घोटाळ्यासंदर्भातील  न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आमच्याकडून सर्व गोष्टी पार पाडण्यात आल्या आहेत. आता निकाल कधी येतो याची वाट पाहतो आहे, असा सूचक इशारा पाटील यांनी दिला आहे.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.