Congress : राजस्थानातील अंतर्गत मतभेद मिटणार की वाढणार, अशोक गहलोत यांनी स्पष्टच सांगितले

| Updated on: Sep 27, 2022 | 6:25 PM

राजस्थानमध्ये निर्माण झालेल्या राजकीय स्थितीनंतर गहलोत आणि सोनिया गांधी यांची चर्चा झाली आहे. त्यानंतर अशोक गहलोत यांनी नेमकी काय भूमिका घेतली यावरच राजस्थानची राजकीय स्थिती काय हे ठरणार आहे.

Congress : राजस्थानातील अंतर्गत मतभेद मिटणार की वाढणार, अशोक गहलोत यांनी स्पष्टच सांगितले
मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी
Follow us on

मुंबई : कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या (Congress President) निवडीपूर्वीच राजस्थानात मुख्यमंत्री पदावरुन घमसान सुरु झाले आहे. मुख्यमंत्री म्हणून सचिन पायलट (Sachin Pilot) यांना स्विकारण्यास पक्षातील आमदारांची ना आहे. तर अशोक गहलोत हे पक्षाच्या अध्यक्ष पदाची निवडणुक लढविणार आहेत. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून राजस्थानमध्ये राजकीय नाट्य रंगले असून अखेर अशोक गहलोत (Ashok Gehlot) आणि सोनिया गांधी यांची याबाबत चर्चा झाली आहे. या दरम्यान, आपण हायकमांडचे मन दुखविणार नसल्याचे गहलोत यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, निर्माण झालेल्या स्थितीवर तोडगा कसा काढला जाणार याबाबत त्यांनी काही सांगितले नाही.

राजस्थानचे सध्याचे मुख्यमंत्री अशोक गहलोत हे आता कॉंग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार आहेत. पुढील महिन्यात ही निवडणूक होणार आहे. मात्र, एक व्यक्ती, एक पद हे कॉंग्रेसचे धोरण असल्याने त्यांना राजस्थानच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे.

अशोक गहलोत हेच मुख्यमंत्री रहावेत अशी ईच्छा आमदारांची आहे. तर याबाबत झालेल्या बैठकीनंतर 92 कॉंग्रेसच्या आमदारांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. त्यामुळे राजस्थानचे राजकारण चांगलेच तापले होते. तर सचिन पायलट यांना केवळ 10 आमदारांचा पाठिंबा होता.

राजस्थानात निर्माण झालेल्या परस्थितीमुळे गहलोत आणि सोनियां गांधी यांची यावर चर्चा झाली आहे. त्यानंतर मात्र, गहलोत यांनी आपली भूमिका मांडली असून हायकमांडची निराशा होईल असा एकही निर्णय घेतला जाणार नाही. शिवाय वरिष्ठांचा जो निर्णय असेल तोच आपल्यासाठी अंतिम राहिल असेही गहलोत म्हणाले आहेत.

अध्यक्षपदी कोण इथपर्यंत पक्षाचेही असे काही ठरलेले नाही, राजस्थानमध्ये निर्माण झालेल्या परस्थितीनंतर सोनिया गांधी पुन्हा एकदा वरिष्ठ नेत्यांशी बोलणार आहेत. त्यानंतरच अंतिम निर्णय होणार आहे. अध्यक्ष पदाच्या निवडीपूर्वीच राजस्थानमध्ये निर्माण झालेली परस्थिती आटोक्यात आणावी लागणार आहे.