राहुल गांधी यांना भाषणं कोण लिहून देतं?

| Updated on: Jul 05, 2019 | 4:07 PM

मुंबई : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची प्रतिमा 2014 च्या तुलनेत फारच चमकू लागली आहे. 2014 साली भाजपच्या सोशल मीडियाने राहुल गांधी यांची प्रतिमा ‘पप्पू’ अशी केली होती. मात्र, त्या ट्रोलिंगमधून आपण शिकल्याचे राहुल गांधी यांनी स्वत: अनेकदा सांगितले आहे. आता राहुल गांधी यांची प्रतिमा 2014 च्या तुलनेत फार बदलली असून, चेहऱ्यावरील विश्वास, बोलण्यातील ठामपणा […]

राहुल गांधी यांना भाषणं कोण लिहून देतं?
Follow us on

मुंबई : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची प्रतिमा 2014 च्या तुलनेत फारच चमकू लागली आहे. 2014 साली भाजपच्या सोशल मीडियाने राहुल गांधी यांची प्रतिमा ‘पप्पू’ अशी केली होती. मात्र, त्या ट्रोलिंगमधून आपण शिकल्याचे राहुल गांधी यांनी स्वत: अनेकदा सांगितले आहे. आता राहुल गांधी यांची प्रतिमा 2014 च्या तुलनेत फार बदलली असून, चेहऱ्यावरील विश्वास, बोलण्यातील ठामपणा आणि भाषणातील मुद्देसूदपणा लोकांना भावत आहे. राहुल गांधी यांच्या सौम्य भाषेतील भाषणांची तर सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. राहुल गांधी यांना ही भाषणं संदीप सिंह नावाचा तरुण लिहून देत असल्याचे समोर आले आहे.

राजकीय पटलावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची प्रतिमा काहीशी उंचावतानाचं चित्र पहायला मिळते आहे. आधी गुजरात आणि त्यानंतर राजस्थान, मध्य प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकांवेळी राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींविरोधात रान उठवलं होत. यावेळी राहुल गांधींचा वाढलेला आत्मविश्वास आणि भाषणातील जोरदार फटकेबाजीची मोठी चर्चा झाली. याच आत्मविश्वासासह राहुल गांधीनं लोकसभा निवडणुकी आधी राफेल विमान घोटाळा, पुलवामा दहशतवादी हल्ला, बेरोजगारी अशा अनेक मुद्यांवरुन मोदी सरकारला घेरण्याच प्रयत्न केला. मात्र राहुल गांधींच्या सत्ताध्याऱ्यांवर धडाडणाऱ्या या तोफेमागे मात्र एका चाणाक्याचा हात आहे. या चाणाक्याचं नाव आहे संदीप सिंह.

कोण आहेत संदीप सिंह?

संदीप सिंह यांचा जन्म उत्तर प्रदेशच्या प्रतापगडमधील सामान्य कुटुंबातील झाला. जवाहरलाल नेहरु विश्वविद्यालयमधून संदीप सिंह यांचं शिक्षण पूर्ण झालं. संदीप सिंह यांच्यावर डाव्या विचारांचा पगडा असून, कम्युनिस्ट पार्टीच्या ‘ऑल इंडिया स्टुडेंट्स एसोसिएशन’ या विद्यार्थी संघटनेचे सदस्य आहेत. 2017 पासून संदीप सिंह राहुल गांधींच्या संपर्कात होते.

हे तेच संदीप सिंह आहेत, ज्यांनी 2005 साली तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना जेएनयू विद्यापीठात काळे झेंडे दाखवले होते. आता मात्र हाच तरुण काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा चाणाक्य म्हणून ओळखला जातो.

महाआघाडीच्या निर्णयापासून प्रियांका गांधींना उत्तर प्रदेशच्या महासचिव बनवण्याच्या निर्णयापर्यंत, ते अगदी राहुल गांधींनी अमेठी आणि वायनाड या दोन मतदार संघातून निवडणूक लढवण्याच्या निर्णयापर्यंत राहुल गांधींच्या मागचं डोकं मात्र संदीप सिंह यांचं. त्यामुळे आता राहुल गांधींचा हा चाणाक्य लोकसभेत त्यांना कितपत तारु शकतो, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.