ग्राऊंड रिपोर्ट : राज ठाकरेंच्या सभेचा सुशीलकुमार शिंदेंसाठी किती फायदा?

| Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM

सोलापूर : एरवी काँग्रेस नेत्यांवर आगपाखड करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आता काँग्रेसच्याच जवळ आले आहेत. काँग्रेसच्या उमेदवारांसाठी ते सभाही घेणार आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरेंची 15 तारखेला सोलापुरात सभा होणार आहे.  मात्र खरंच राज ठाकरेंच्या सभेचा काँग्रेसला फायदा होईल का? सभेला […]

ग्राऊंड रिपोर्ट : राज ठाकरेंच्या सभेचा सुशीलकुमार शिंदेंसाठी किती फायदा?
Follow us on

सोलापूर : एरवी काँग्रेस नेत्यांवर आगपाखड करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आता काँग्रेसच्याच जवळ आले आहेत. काँग्रेसच्या उमेदवारांसाठी ते सभाही घेणार आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरेंची 15 तारखेला सोलापुरात सभा होणार आहे.  मात्र खरंच राज ठाकरेंच्या सभेचा काँग्रेसला फायदा होईल का? सभेला जमलेल्या गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होईल का? याचं उत्तर निकालात मिळणार आहेच, पण मनसेची सोलापुरात किती ताकद आहे, याचाही आढावा सभेपूर्वी घेणं गरजेचं आहे.

राज ठाकरे यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाहीरपणे पाठिंबा दिला होता. पण ते आता राष्ट्रवादी आणि काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेणार आहेत. सोलापुरात भाजपने डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना उमेदवारी दिली आहे, तर वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ. प्रकाश आंबेडकर यांचंही शिंदेंसमोर आव्हान आहे. काँग्रेसची पारंपरिक दलित आणि मुस्लीम मते ही आता प्रकाश आंबेडकरांच्या बाजूने कौल देण्याचा अंदाज आहे. त्यामुळे शिंदेंना एकेक मत आता महत्त्वाचं आहे. त्यामुळे तरुणांची मते मिळवण्यासाठी, त्यांचं मन वळवण्यासाठी राज ठाकरेंना प्रचारात उतरवलं जातं आहे. मात्र त्याचा फारसा परिणाम होणार नसल्याचा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे.

मनसेची विधानसभेतील कामगिरी

राज ठाकरे यांच्या सोलापुरातील सभांना प्रचंड गर्दी होत असते. मात्र त्या गर्दीचे मतात कधी रूपांतर झाले नाही. मनसेने 2014 विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील 11 मतदारसंघापैकी 4 जागा लढवल्या होत्या. मात्र त्यात चारही उमेदवारांचे डिपॉजिट जप्त झाले होते. चारही मतदारसंघात साधारणतः पाच टक्के मतदान हे मनसेच्या बाजूने झाले होते आणि हीच पाच टक्के मते शिंदेंच्या पारड्यात पडतील असा अंदाज आहे.

राज ठाकरे ज्या सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारासाठी येत आहेत, ते सुशीलकुमार शिंदे गृहमंत्री असताना फेब्रुवारी 2013 मध्ये सोलापुरात घेतलेल्या जाहीर सभेत राज यांनी शिंदेवरच टीकेची झोड उठवली होती. तेच राज आता शिंदेंच्या प्रचारार्थ सभा घेणार आहेत. त्यामुळे आता शिंदेंच्या समर्थनार्थ राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता आहे. येत्या 15 तारखेला राज ठाकरेंची सभा होणार आहे. त्याला नेहमीप्रमाणे गर्दी होणार हे निश्चित असलं तरी त्याचं मतात रूपांतर होणार की नाही हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे.