Uddhav Thackeray : जेव्हा जेव्हा ‘उद्धव संपले’ असं लोक म्हणााले, तेव्हा तेव्हा घडलं उलटंच! इतिहास हेच सांगतोय, पाहा नेमकं काय आहे रेकॉर्ड?

| Updated on: Jun 26, 2022 | 12:05 PM

Uddhav Thackeray : तेव्हा सगळे त्यांच्यावर हसले होते. त्यानंतर त्यांचं दादरला येणं अचानक थांबवलं होतं.

Uddhav Thackeray : जेव्हा जेव्हा उद्धव संपले असं लोक म्हणााले, तेव्हा तेव्हा घडलं उलटंच! इतिहास हेच सांगतोय, पाहा नेमकं काय आहे रेकॉर्ड?
उद्धव संपले?
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई : शिवसेना (Shiv sena Politics) पक्षप्रमुख पद घेण्याआधी असेल, मुख्यमंत्रीपद असेल, कार्याध्यक्ष पद असेल, उद्धव ठाकरे हे नाव आक्रमक शिवसेनेला मवाळच वाटलं होतं. ‘यांना काही जमाणार नाही, यांच्याच्याने काही होणार नाही’ अशी कुजबूज केली गेली. पण त्या सगळ्यांना उद्धव ठाकरे पुरुन उरले होते. एकीकडे राज ठाकरेंचा (Raj Thackeray) आक्रमकपणा उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) कुठेच पुढे येऊ देणार नाही, असं सांगितलं जात होतं. पण वास्तवात मात्र वेगळ्या घडामोडी घडल्या. जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरे संपले, असं लोक म्हणाले, तेव्हा तेव्हा घडलं उलटंच! ही आजची गोष्ट नाही, तर गेल्या काही वर्षात हेच पाहायला मिळालंय. जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरे कमजोर पडतायत असं दिसू लागलं, त्यानंतर लगेच नाही, पण एक विशिष्ट वेळ घेत त्यांनी आपला दबदबाही सिद्ध केलाय.

सुरुवात कुठून झाली?

आता महाराष्ट्रात राजकीय संकट उभं राहिलंय. या संकटातही कोरोनानं उद्धव ठाकरेंना गाठलंय. पण त्यातही त्यांनी फेसबुक लाईव्ह केलं. फेसबुक लाईव्ह म्हणजे आपलं होमपिच असल्यासारखं वाटत त्यांनी फुल्ल बॅटिंग केली. आपली भूमिका स्पष्ट करुन वर्षावरुन निघून गेले आणि मातोश्रीत परतले. उद्धव ठाकरेंचा वर्षा ते मातोश्री हा प्रवास तमाम महाराष्ट्राने पाहिला. उद्धव ठाकरेंचा हा एक इमोशनल टच असेल, किंवा सामान्य माणसासारखा वाटणारा एक सॉफ्ट आणि सर्वसामान्यपणे बोलण्याचा स्वभाव असेल, या सगळ्या गोष्टी उद्धव ठाकरेंच्या पथ्यावर पडतील असं सांगितलं जात होतं. पण झालं उलटंच. हे आम्ही नाही तर गेल्या काही वर्षांतल्या घटनांनीच अधोरेखित केलंय.

ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक संजय आवटे यांनी नमूद केलेल्या पाच प्रसंगातून हेच अधोरेखित झालं आहे. काय आहेत हे पाच प्रसंग जाणून घेऊयात..

  1. राज ठाकरेंनी 2005 मध्ये बंड केलं, तेव्हा लोक म्हणाले, राजच्या करिष्म्यापुढे उद्धव संपले.
  2. 2012 मध्ये बाळासाहेब गेले. लोक म्हणाले, उद्धव संपले.
  3. मोदी लाटेनंतर 2014 ची विधानसभा निवडणूक भाजपच्या विरोधात सेनेनं लढवली. लोक म्हणाले, उद्धव संपले.
  4. सत्तेत सोबत असतानाही भाजपने शिवसेनेची फरफट केली. मुंबई महापालिका विरोधात लढवली. लोक म्हणाले, उद्धव संपले.
  5. 2019 च्या विधानसभा निकालानंतर थेट मोदी-शहांना आव्हान देत, अभूतपूर्व रस्ता निवडला. तेव्हा लोक म्हणाले उद्धव संपले.

या पाचही वेळा उद्धव काही संपले नाहीत. उलटपक्षी (हा त्यांचाच लाडका शब्द) अधिकच यशस्वी होत गेले.आजही लोक म्हणताहेत, ‘उद्धव संपले!’ पण खरंच ते संपणार आहेत की उभारी घेणार आहे, हे आता येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.

चॅम्पियन उद्धव!

धवल कुलकर्णी यांनी आपल्या `द कझिन्स ठाकरे` या पुस्तकात एक महत्त्वाचा प्रसंग नोंदवला आहे. हा प्रसंग आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचा. राज ठाकरे त्यांच्या मित्रांबरोबर बॅडमिंटन खेळण्यासाठी येत. उद्धव ठाकरेही नेहमी दादरला येत. यावेळी एकदा खेळता खेळता उद्धव पडले. तेव्हा सगळे त्यांच्यावर हसले होते. त्यानंतर त्यांचं दादरला येणं अचानक थांबल्यांचही धवल कुलकर्णी लिहिलात. यानंतर उद्धव ठाकरे यांनी पणच केला. त्यांनी वांद्र्याच्या एमआयजी क्लबमधे बॅडमिंटनचं रीतसर प्रशिक्षण घेतलं. सहा महिन्यांनंतर ते जेव्हा पुन्हा खेळायला आले, तेव्हा ते एका चॅम्पियनसारखेच खेळले होते.

उद्धव ठाकरेंच्या बाबतीत राजकारणातही त्यांनी हेच केल्याचं सातत्यानं दिसून आलं होतं. दोन विधानसभा निवडणुकांमधला पराभव असेल, नारायण राणे आणि राज ठाकरेंचं बंड असेल, बाळासाहेब ठाकरे यांचं निधन असेल, किंवा मग हार्टचं ऑपरेशन असेल. या सगळ्या धक्क्यांमध्ये उद्धव संपले असं म्हणणाऱ्यांना त्यांच्या राजकारणानेच उत्तर दिलं होतं. आता पुन्हा उद्धव ठाकरे यांना तसंच उत्तर द्यायला जमेल का? हाही मुद्दा आहे.

वाचा एकनाथ शिंदे विरुद्ध शिवसेना या राजकीय भूकंपाचे लाईव्ह अपडेट्स : Eknath Shinde vs Shiv sena Live