राजगृहात प्रकाश आंबेडकर -वसंत मोरे यांच्यात दिलजमाई?

Vasant More-Prakash Ambedkar : पुण्यातील लोकसभा निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हं दिसत आहेत. पुण्यात भाजपने मुरलीधर मोहोळ तर काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. तर आता ताज्या घडामोडीनुसार, वसंत मोरे हे वंचितचा चेहरा असू शकतात. काय आहे अपडेट

राजगृहात प्रकाश आंबेडकर -वसंत मोरे यांच्यात दिलजमाई?
झाली का दिलजमाई?
Follow us
| Updated on: Mar 29, 2024 | 3:23 PM

पुण्यात तिरंगी लढत पाहायला मिळू शकते. मनसेतून बाहेर पडलेले वसंत मोरे वंचितचा चेहरा होऊ शकतात. त्यामुळे बारामती, शिरुर प्रमाणेच पुण्यनगरीत पण चुरस पाहायला मिळू शकते. ही लोकसभा निवडणूक हायहोल्टेज ठरण्याची दाट शक्यता आहे. वसंत मोरे यांनी आज सकाळीच ठरल्याप्रमाणे प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमधील सूर जुळल्याचे दिसून आले. दोन्ही नेत्यांच्या या बैठकीत प्रकाश आंबेडकर यांचा हास्यविनोद आणि वसंत मोरे यांचा खुललेला चेहरा बरेच काही सांगून जात होता.

बाळासाहेब आणि वसंत मोरे यांची भेट

वसंत मोरे यांनी आज मुंबईत दादर येथील प्रकाश आंबेडकर यांच्या राजगृहात प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. मोरे हे वंचितकडून पुणे लोकसभेची निवडणूक लढवू इच्छित आहेत. त्यादृष्टीने झालेली ही गाठभेट बरेच काही सांगून गेली. वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांनी लोकसभेच्या रिंगणात उतरण्याचा चंग बांधला. त्यांनी बड्या नेत्यांच्या भेटीगाठींचे सत्र सुरु केले होते. महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर ते अपक्ष शड्डू ठोकतील असे वाटत होते. पण त्यांनी सर्वांचाच अंदाज चुकवत वंचितचा झेंडा हाती घेण्याचा निर्णय व्यक्त केला. त्यासाठीच ते बाळासाहेब आंबेडकर यांच्या भेटीला मुंबईत पोहचले.

हे सुद्धा वाचा

प्रकाश आंबेडकर यांच्या प्रयोगाला यश?

मागील लोकसभेत भारिप-बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात वंचितचा प्रयोग घडवून आणला. त्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये अभूतपूर्व विजय खेचून आणण्यात यश आले. अर्थात एमआयएमसोबतच्या या प्रयोगाविषयी अनेक मत प्रवाह नंतर समोर आले. त्यातून आंबेडकर यांना काय मिळाले, याचा हिशेब काहींनी बोलून दाखवला. त्यानंतर आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना सोबत घेत, बाळासाहेब पुन्हा वंचितचा नवीन प्रयोग करु पाहत आहेत. अर्थात मनोज जरांगे यांची भूमिका उद्या 30 मार्च रोजी समोर येईल. पण दोन्ही नेत्यांची अंतरवाली सराटीत खलबतं झाली. त्यातून आता काय घडते हे लवकरच राजकीय पटलावर समोर येईलच. पण तुर्तास अनेक जण वंचितकडे आशेने पाहत आहेत, हे ही नसे थोडके.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.