Pune Lockdown | पुण्यातील लॉकडाऊनला व्यापारी महासंघाचा विरोध, निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी

यापूर्वीच्या लॉकडाऊनमध्ये व्यापाऱ्यांचे अब्जावधी रुपयांचे नुकसान झाले. मात्र, आता पुन्हा लॉकडाऊन केल्याने 10% सुरळीत झालेला व्यापार पुन्हा अडचणीत येईल

Pune Lockdown | पुण्यातील लॉकडाऊनला व्यापारी महासंघाचा विरोध, निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी
Follow us
| Updated on: Jul 10, 2020 | 10:03 PM

पुणे : पुण्यात दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे (Pune Vyapari Mahasangh Oppose Lockdown Extension). मात्र, या लॉकडाऊनला पुणे व्यापारी महासंघाने विरोध केला आहे. या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी व्यापारी महासंघाने केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसह प्रशासकीय अधिकार्‍यांशी त्यांनी पत्रव्यवहार केला आहे.

पुणे शहरात निर्बंध नसलेल्या भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्याचबरोबर नागरिक नियमांचं पालन करत नाहीत. त्यामुळे दुकाने बंद करणे हा त्यावर उपाय नाही”, असं व्यापारी महासंघाने म्हटलं आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज! 

पुण्यातील लॉकडाऊन वाढवल्यासंदर्भात व्यापारी महासंघाने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. “यापूर्वीच्या लॉकडाऊनमध्ये व्यापाऱ्यांचे अब्जावधी रुपयांचे नुकसान झाले. मात्र, आता पुन्हा लॉकडाऊन केल्याने 10% सुरळीत झालेला व्यापार पुन्हा अडचणीत येईल”, असा दावा व्यापारी महासंघाने केला आहे.

दुकानं 15 दिवस सुरु आणि पगार 30 दिवसांचा द्यावा लागतोय – व्यापारी महासंघ

व्यापाऱ्यांना संपूर्ण पगार द्यावा लागत आहे. व्याजाचे हप्ते आणि त्यावरील व्याज, विजेचं बिल द्यावे लागत आहे. दुकान भाडे, घर भाडे, घर खर्च असा अनेक खर्च वाढत चाललेला आहे. कोणतेही आर्थिक उत्पन्न नसताना गेल्या तीन महिन्यापासून आर्थिक फटका बसत आहे. त्याचबरोबर सम-विषम असं नियोजन केल्यामुळेही अनेक अडचणी व्यापाऱ्यांना भेडसावत असल्याचा आरोप व्यापारी महासंघाने केला. (Pune Vyapari Mahasangh Oppose Lockdown Extension)

ग्राहक संभ्रमात असून कुठल्या दिवशी कोणती दुकानं उघडली, याबाबतची कल्पना येत नाही. ग्राहकांच्या पसंतीचे दुकान बंद असल्यास त्यांना परत जावे लागते. त्यामुळे विनाकारण रस्त्यावर वाहनांची गर्दी वाढत आहे. पी वन पी टूमुळे दहा टक्‍क्‍यांपेक्षा कमी व्यवसाय होत आहे. केवळ पंधरा दिवस दुकानं सुरु राहतात. मात्र, तीस दिवसाचा पगार द्यावा लागतं, असंही व्यापारी महासंघाने सांगितलं आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा लॉकडाऊन

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी याबाबतचे आदेश दिले. त्यानुसार, येत्या सोमवारपासून म्हणजे 13 जुलैच्या मध्यरात्रीपासून पुढचे 10 दिवस लॉकडाऊन असेल. यादरम्यान, फक्त अत्यावश्यक सेवा म्हणजे मेडिकल, दवाखाने आणि दूध सुरु राहील. अत्यावश्यक प्रवासासाठी ई पास गरजेचा असेल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

Pune Vyapari Mahasangh Oppose Lockdown Extension

संबंधित बातम्या :

भाजीपाला भरुन ठेवा, खरेदी असेल ती करुन घ्या, पुणे-पिंपरीत कडक लॉकडाऊन

BREAKING | पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दहा दिवसांचा लॉकडाऊन

Non Stop LIVE Update
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा.
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?.
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग.
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?.
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?.
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?.
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार.
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.