भाजीपाला भरुन ठेवा, खरेदी असेल ती करुन घ्या, पुणे-पिंपरीत कडक लॉकडाऊन

सोमवार 13 जुलै मध्यरात्रीपासून लॉकडाऊन सुरु होईल. लॉकडाऊन कधीपर्यंत लागू असेल याचा निर्णय त्या वेळच्या परिस्थितीनुसार घेतला जाईल, असं अजित पवार म्हणाले.

भाजीपाला भरुन ठेवा, खरेदी असेल ती करुन घ्या, पुणे-पिंपरीत कडक लॉकडाऊन

पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी याबाबतचे आदेश दिले. त्यानुसार येत्या सोमवारपासून म्हणजे 13 जुलैच्या मध्यरात्रीपासून पुढचे 10 दिवस लॉकडाऊन असेल. (Pune Pimpari Chinchwad Lockdown announced by Ajit Pawar)

पुणे आणि पिंपरी शहरात कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. सोमवार 13 जुलै मध्यरात्रीपासून लॉकडाऊन सुरु होईल. लॉकडाऊन कधीपर्यंत लागू असेल याचा निर्णय त्या वेळच्या परिस्थितीनुसार घेतला जाईल, असं अजित पवार म्हणाले. फक्त अत्यावश्यक सेवा म्हणजे मेडिकल, दवाखाने आणि दूध सुरु राहील. अत्यावश्यक प्रवासासाठी ई पास गरजेचा असेल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही पोलीस आयुक्तालय परिसरात लॉकडाऊन लागू असेल. 22 गावांमध्ये कोरोनाच्या केसेस अधिक आहेत. त्यात आणखी गावे समाविष्ट होतील. एखाद्या भागात पाचपेक्षा जास्त रुग्ण असतील, तर पूर्ण लॉकडाऊन करणार, मात्र उद्योग पूर्ण बंद करायचे नाहीत, असे अजित पवार यांनी सांगितले.

विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर 

– पुण्यातील वाढती संख्या बघून महत्वाचा निर्णय
– पुणे आणि पिंपरी चिंचवडसह काही ग्रामीण भागामध्ये लॉकडाऊन
– सोमवार रात्री 12 वाजल्यापासून लॉकडाऊन सुरू
– एकूण दहा दिवस पुण्यात लॉकडाऊन
– अत्यंत कडक लॉकडाऊन केला जाईल
– 23 जुलैपर्यंत लॉकडाऊन असणार
– दूध विक्रेते, औषधे दुकाने, दवाखानेच सुरु राहणार
– 13 जुलै ते 18 जुलै दरम्यान कडक अंमलबजावणी
– सुरुवातीला पाच दिवस कडक अंमलबजावणी
– 18 जुलैनंतर काय सुरु राहील त्याबाबत दोन दिवसात नवीन सूचना देण्यात येईल
– अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांना पोलिसांकडून ऑनलाइन पास दिला जाईल
– पुणेकरांनी भाजीपाला आणि इतर वस्तूंची खरेदी करुन घ्यावी
– आरोग्य, स्वच्छता आणि पाणीपुरवठा या सेवाच सुरु राहतील
– इतर कुठलीही अ‍ॅक्टिव्हिटी सुरु राहणार नाही
– पूर्वीप्रमाणेच लॉकडाऊन करण्याचा प्रयत्न

पुणे महापालिका आयुक्त  शेखर गायकवाड –

– पहिले पाच दिवस कडकडीत बंद
– ऑनलाइन पास पोलीस आयुक्तांलयाकडून मिळतील
– दोन दिवसांत सविस्तर आदेश काढला जाईल
– खरेदी करायची असेल तर आधीच करून घ्या

अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

– पुणे पोलिस आयुक्तालय , पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत लॉकडाऊन करण्याचा निर्णय
– याबद्दल मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा
– लोकांना त्रास होईल, पण रुग्णसंख्या वाढत असल्याने निर्णय
– दोन दिवसांनी लॉकडाऊनला सुरुवात होईल. लॉकडाऊन कधीपर्यंत लागू असेल याचा निर्णय त्यावेळच्या परिस्थितीनुसार घेतला जाईल.
– लोकांना काही गोष्टी खरेदी करण्यासाठी वेळ देणं आवश्यक आहे.
– अनेक देशांमध्ये लॉकडाऊन पुन्हा लागू करावं लागलं. याचा अर्थ पहिलं लॉकडाऊन चुकलय असा होत नाही.

– सारथीला छत्रपती शाहू महाराजांचं नाव आहे. त्याला साजेसं काम झालं पाहिजे.
– सारथीच्या कामकाजाची माहिती, सारथीकडून होणाऱ्या खर्चाची माहिती लोकांना वेबसाईटवर वेळेच्या वेळी समजायला हवी

– कर्जमाफीतून राहिलेल्या शेतकऱ्यांना आम्ही साडेआठ हजार कोटींची कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतलाय.
– आघाडी चालवताना दोन पक्षांनी एकमेकांची माणसं आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न केला, तर आघाडीवर परिणाम होतो, मात्र ते नजरचुकीने झालं, आता ते दुरुस्त केलंय

पाहा व्हिडीओ :

(Pune Pimpari Chinchwad Lockdown announced by Ajit Pawar)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *