BREAKING | पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दहा दिवसांचा लॉकडाऊन

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये येत्या सोमवारपासून पुन्हा एकदा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. Ajit Pawar announce lock down again in Pune

BREAKING | पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दहा दिवसांचा लॉकडाऊन
Follow us
| Updated on: Jul 10, 2020 | 6:09 PM

पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी याबाबतचे आदेश दिल्यानंतर विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली.  त्यानुसार येत्या सोमवारपासून म्हणजे 13 जुलैच्या मध्यरात्रीपासून पुढचे 10 दिवस लॉकडाऊन असेल. लवकरच याची सविस्तर नियमावली जारी केली जाणार आहे. (Pune Lockdown again)

“पुण्यात दहा दिवसांच्या कडक लॉकडाऊन असेल. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कडक लॉकडाऊन असेल. सोमवारी (13 जुलै) मध्यरात्रीपासून ते 24 जुलैपर्यंत लॉकडाऊन असेल. लॉकडाऊनचे आदेश जिल्हाधिकारी काढणार आहेत. दूध, औषधे आणि अत्यावश्यक सेवा सुरु राहतील”,अशी माहिती विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली (Pune Lockdown again)

पुणे-पिंपरीत पुन्हा लॉकडाऊन

  • पुणे आणि पिंपरी शहरात कडक लॉकडाऊन
  • येत्या 13 जुलै मध्यरात्रीपासून 24 जुलैपर्यंत लॉकडाऊन
  • पुणे शहर, पिंपरी आणि पुणे जिल्ह्यात दोन्ही पोलीस आयुक्त परिसरात लॉकडाऊन लागू
  • 22 गावांमध्ये कोरोनाच्या केसेस अधिक, अजून गावे समाविष्ट होतील.
  • फक्त अत्यावश्यक सेवा मेडिकल आणि दूध सुरु राहील
  • अत्यावश्यक प्रवासासाठी ई पास गरजेचा
  • पाच पेक्षा जास्त रुग्ण असेल तर पूर्ण लॉकडाऊन करणार, उद्योग पूर्ण बंद करायचे नाहीत
  • 13 जुलै ते 18 जुलै दरम्यान कडक अंमलबजावणी
  • सुरुवातीला पाच दिवस कडक अंमलबजावणी
  • १८ जुलै नंतर काय सुरू राहील त्याबाबत दोन दिवसात नवीन सूचना देण्यात येईल
  • अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांना पोलिसांकडून ऑनलाईन पास दिला जाईल
  • पुणेकरांनी भाजीपाला आणि इतर वस्तूंची खरेदी करून घ्या
  • आरोग्य, स्वच्छता आणि पाणीपुरवठा या सेवाच सुरू राहतील
  • इतर कुठलीही अॅक्टिव्हिटी सुरू राहणार नाही
  • पूर्वी प्रमाणेच लॉकडाऊन करण्याचा प्रयत्न

आयुक्त शेखर गायकवाड काय म्हणाले?

  • पहिले पाच दिवस कडकडीत बंद
  • ऑनलाईन पास पोलीस आयुक्तांलयाकडून मिळतील
  • दोन दिवसांत सविस्तर आदेश काढला जाईल
  • नागरिकांना बाहेर कुठं जायचे असेल तर जाऊन या
  • खरेदी करायची असेल तर आधीच करून घ्या

पुण्यात पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मूलन आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आढावा बैठकीत मर्यादित वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील, सोशल डिस्टन्स पाळण्यावर कटाक्ष देण्यात आला होता.

यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनीही पुन्हा लॉकडाऊन करण्याचा इशारा दिला होता.  “कोरोनाचा धोका टळलेला नाही. तरीही पुण्यात काही नागरिक कोणत्याही कारणाशिवाय घराबाहेर पडत आहेत. विशेष म्हणजे अनेक नागरिक मास्क न वापरता खुलेआम फिरत आहेत. त्यामुळे अशीच परिस्थिती कायम राहिल्यास प्रशासनाला आणखी कडक भूमिका घ्यावी लागेल. वेळप्रसंगी पुन्हा लॉकडाऊन घोषित करावा लागेल, असा इशारा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी चार दिवसापूर्वी दिला  होता.

वाचा : Lockdown | …तर पुण्यात पुन्हा लॉकडाऊन घोषित करावा लागेल, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा 

पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

“कोरोनाचा रुग्ण आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी अधिक जबाबदारीने काम (Naval Kishor Ram on Pune corna Patient) करा”, अशा सूचना पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणासाठी नियोजन करण्याच्या दृष्टीने 9 जुलैला जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना सचूना (Naval Kishor Ram on Pune corna Patient) दिल्या.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज! 

“कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेल्या भागात कंटेन्मेंट झोन तयार करा. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध आणि तपासणी प्रभावीपणे करा. कोरोना तपासणी अहवाल लॅबकडून 24 तासात मिळण्यासाठी प्रयत्न करा”, असंही नवल किशोर राम यांनी सांगितले.

पुण्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढतीच

पुणे जिल्ह्यात सकाळी 9 वाजेपर्यंतच्या बारा तासात 183 नवे कोरोना रुग्ण आढळले होते. पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 34 हजार 582 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 979 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

पुणे शहरातील कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येने 15 हजारांचा टप्पा ओलांडला. आतापर्यंत 15 हजार 579 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 8 हजार 809 रुग्णांपैकी 402 रुग्ण गंभीर असून यातील 75 रुग्ण व्हेंटिलेटरवर तर 327 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.

कोरोना रोखण्यासाठी 4 आयएएसची नियुक्ती

पुण्यातील कोरोना रोखण्यासाठी 4 आयएएस अधिकार्‍यांची नियुक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाने करण्यात आली आहे. कोरोना रोखण्यासाठी आणि उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचे सदस्य सचिव माने, क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्त पवनीत कौर, कृषि आयुक्त सुहास दिवसे यांची याकामी नियुक्ती झाली. यापूर्वी सहकार आयुक्त, पशुसंवर्धन आयुक्त, साखर आयुक्त, भूजल सर्वेक्षण आणि विकास संचालक यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या 

कोरोना रुग्ण आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांचं प्लॅनिंग 

Non Stop LIVE Update
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?.
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे.
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?.