Shani Vakri 2025: या 3 राशी गाठणार यशाची उंची, शनिदेवांनी मीन राशीत सुरू केली वक्री चाल

आज 13 जुलै 2025 रोजी मीन राशीत असताना शनिदेवांनी वक्री म्हणजेच उलटी चाल सुरू केली आहे. शनीच्या वक्री चालीमुळे काही राशींच्या लोकांचं नशीब बळकट होईल. चला जाणून घेऊया त्या कोणत्या तीन राशी कोणत्या आहेत? ज्यांना आजपासून शनीच्या उलट्या चालीमुळे फायदा होणार आहे.

Shani Vakri 2025: या 3 राशी गाठणार यशाची उंची, शनिदेवांनी मीन राशीत सुरू केली वक्री चाल
Shani vakri
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jul 13, 2025 | 5:10 PM

शनी हा एक अत्यंत महत्त्वाचा ग्रह आहे, ज्याला कर्म आणि न्यायाचा देवता मानलं जातं. शनीच्या शुभ प्रभावामुळे व्यक्तीच्या मनात धैर्य निर्माण होतं आणि तो आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मेहनत करतो. मात्र, जेव्हा-जेव्हा शनी ग्रह आपली जागा बदलतो, तेव्हा त्याचा खोल परिणाम राशींच्या आयुष्यातील छोट्या-छोट्या बाबींवर होतो. द्रिक पंचांगानुसार, आज, 13 जुलै रोजी सकाळी 9 वाजून 36 मिनिटांनी शनिदेव वक्री झाले आहेत. शनिदेवांनी मीन राशीत उलटी चाल सुरू केली आहे, जी 28 नोव्हेंबर 2025 च्या सकाळी 9 वाजून 20 मिनिटांपर्यंत अशीच राहील.

हे 138 दिवस अनेक राशींच्या लोकांसाठी शुभ असतील. या काळात त्यांना आयुष्यात पुढे जाण्याच्या संधी मिळतील आणि आरोग्यही चांगलं राहील. याशिवाय, आयुष्यात सुख-शांती राहील. चला जाणून घेऊया की 2025 मध्ये शनीच्या वक्री चालीमुळे कोणत्या राशींना धन, सुख, वैभव आणि मान-सन्मान मिळण्याची शक्यता जास्त आहे.

वाचा: जपानी बाबा वेंगाची 2026 साठीची आजवरची सर्वात खतरनाक भविष्यवाणी, जगावर संकट ओढवणार, या देशात होणार…

मिथुन राशी

शनीच्या वक्री चालीचा प्रभाव मिथुन राशींच्या दहाव्या भावावर होईल. कुंडलीतील दहावा भाव हा कर्म, करिअर आणि सार्वजनिक प्रतिमेशी संबंधित आहे. या काळात जे लोक चांगली कर्म करतील, त्यांच्या आयुष्यात आनंद वाढेल. रखडलेली कामं गती घेतील आणि धनप्राप्ती होईल. नवीन डील्स आणि भागीदारीमुळे व्यावसायिकांना फायदा होईल, तर नोकरी करणारे लोक, विशेषतः तरुण वर्ग, आपल्या करिअरबाबत समाधानी राहतील. याशिवाय सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याचेही योग आहेत.

कर्क राशी

मिथुनसोबतच कर्क राशीच्या लोकांसाठीही शनीची उलटी चाल शुभ असेल. शनीच्या या चालीचा प्रभाव तुमच्या नवव्या भावावर होईल, ज्याचा संबंध नशीब, लांबच्या प्रवास आणि शिक्षणाशी आहे. विद्यार्थ्यांचा निकाल चांगला येईल आणि कुटुंबातील नातेसंबंध सुधारतील. या काळात तुम्हाला व्यावसायिक कामानिमित्त लांबचा प्रवास करण्याची संधी मिळेल. आध्यात्मिक कार्यात मन रमेल, ज्यामुळे मानसिक शांती मिळेल. याशिवाय, रखडलेले पैसेही मिळू शकतील.

मीन राशी

सध्या शनी गोचराचा मीन राशीच्या लोकांवर अशुभ प्रभाव आहे. पण शनीचं वक्री होणं यांच्यासाठी शुभ ठरेल. शनीच्या वक्री चालीमुळे शनी गोचराचा प्रभाव काहीसा कमी होईल आणि पहिल्या भावावर खोल परिणाम होईल. कुंडलीतील पहिला भाव हा व्यक्तिमत्त्व आणि आत्मविश्वासाशी संबंधित आहे. शनीच्या वक्री चालीदरम्यान मीन राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल आणि ते शिस्तीत राहतील. ते आपल्या करिअरबाबत गंभीर होतील आणि काहीतरी मोठं साध्य करण्यासाठी मेहनत करतील. याशिवाय, आरोग्याचा साथ मिळेल आणि व्यक्तिमत्त्वात निखार येईल.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)