18 वर्षानंतर गुरु आणि केतुमुळे तयार झाला षडाष्टक योग, या राशीच्या जातकांनी घ्यावी आरोग्याची काळजी

ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या स्थितीवरून आकलन केलं जातं. कोणत्या राशीत बसलेला ग्रह कशी फळं देतो याची मांडणी केली आहे. आता गुरु आणि केतुची स्थिती असंच काहीसं सांगत आहे. या दोन्ही ग्रहांच्या स्थितीमुळे काही राशीच्या जातकांना आरोग्याची चिंता सतावणार आहे.

18 वर्षानंतर गुरु आणि केतुमुळे तयार झाला षडाष्टक योग, या राशीच्या जातकांनी घ्यावी आरोग्याची काळजी
18 वर्षानंतर गुरु आणि केतु एकमेकांपासून अशा अंतरावर, ज्योतिषीय गणितानुसार या राशींच्या जातकांना आरोग्याची चिंता
Follow us
| Updated on: Mar 01, 2024 | 3:55 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रात ग्रहांची स्थितीवरून भाकीत केलं जातं. राशीमंडळातील नऊ ग्रहांची स्थिती यावरून मांडणी केली जाते. कोणता ग्रह कोणत्या राशीत स्थित आहे कशाप्रकारे फळ देणार याचा आकलन केलं जातं. सद्यस्थितीत गोचर कुंडलीत गुरु आणि केतुची स्थिती त्रासदायक ठरणार आहे. केतु ग्रह 18 वर्षानंतर कन्या राशीत दीड वर्षांसाठी ठाण मांडून बसला आहे. या राशीत हा ग्रह 2025 पर्यंत असणार आहे. त्यामुळे या दीड वर्षांच्या कालावधीत केतुची कोणावर तरी दृष्टी किंवा युती होणार यात काही शंका नाही. असं असताना गुरु केतुमध्ये एक योग तयार झाला आहे. गुरु ग्रह सध्या मेष राशीत आहे. मेष राशीतील गुरु ग्रहापासून केतु सहाव्या स्थानात आहे. तर कन्या राशीतील केतु ग्रहापासून गुरु आठव्या स्थानात आहे. यामुळे षडाष्टक योग तयार झाला आहे. हा योग 1 मे पर्यंत असणार आहे. गुरुने वृषभ राशीत गोचर करताच हा योग संपुष्टात येणार आहे. या योगामुळे काही राशींच्या जातकांना सांभाळून राहावं लागणार आहे. चला जाणून घेऊयात या राशी कोणत्या ते…

मेष : गुरु ग्रह याच राशीत असून या राशीपासून सहाव्या स्थानात केतु आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना अडचणींचा सामना करावा लागेल. आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा कालावधी तुमच्यासाठी त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांची तब्येत बिघडू शकते.यामुळे तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.आरोग्यविषयक तक्रारी दूर करण्यासाटी नातेवाईक किंवा मित्रांकडून आर्थिक मदत घ्यावी लागेल.

कर्क : या कालावधीत प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. कामाच्या अतिरेकीमुळे शारीरिक थकवा आणि मानसिक ताण येऊ शकतो. बदलत्या हवामानाचा तब्येतीवर परिणाम होईल. आपल्या आहारावर नियंत्रण ठेवा. तुमच्या पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबातील इतर कोणत्याही व्यक्तीचे आरोग्य तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते. आवश्यक असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

धनु : या राशीच्या लोकांना या कालावधीत आरोग्याबाबत काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला धुळीचा त्रास होऊ शकतो. साथीच्या आजारांचा संसर्ग होऊ शकतो. कडक्याच्या उन्हात जाणं टाळा आणि भरपूर पाणी प्या. हलका आहार घेणं योग्य ठरेल. गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. साथीच्या आजारांमुळे मुलांचे आरोग्य बिघडू शकते. त्याचा अभ्यासावर विपरीत परिणाम होईल.

 (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Non Stop LIVE Update
आधी जीवेमारण्याची धमकी आता गोळीबार, सलमान खानच्या घराबाहेर काय घडलं?
आधी जीवेमारण्याची धमकी आता गोळीबार, सलमान खानच्या घराबाहेर काय घडलं?.
प्रचार तापला...टांगा पलटीवरुन सुरू झालेली जहरी टीका; रखेल, नाचे अन्...
प्रचार तापला...टांगा पलटीवरुन सुरू झालेली जहरी टीका; रखेल, नाचे अन्....
आता मनसे महायुतीचा प्रचार करणार, राज ठाकरेंनी सांगितल पाठिंब्याच कारण
आता मनसे महायुतीचा प्रचार करणार, राज ठाकरेंनी सांगितल पाठिंब्याच कारण.
मनसेला ठोकला रामराम. मनसेच्या पाठिंब्यासाठी वंचितचे वसंत मोरे आशावादी
मनसेला ठोकला रामराम. मनसेच्या पाठिंब्यासाठी वंचितचे वसंत मोरे आशावादी.
धाराशिवच्या पाटलांना अजितदादांनीच भाजपात पाठवलं? आधी पोस्टचा वाद आता..
धाराशिवच्या पाटलांना अजितदादांनीच भाजपात पाठवलं? आधी पोस्टचा वाद आता...
मुंबईतील जागेचा तिढा, वर्षा गायकवाड थेट दिल्लीला रवाना, चर्चांना उधाण
मुंबईतील जागेचा तिढा, वर्षा गायकवाड थेट दिल्लीला रवाना, चर्चांना उधाण.
शरद पवार यांच्या 'त्या' विधानावर सुनेत्रा पवार भावूक
शरद पवार यांच्या 'त्या' विधानावर सुनेत्रा पवार भावूक.
गोट्यांसारखे घरंगळत जाऊ नका; राज ठाकरे यांची पदाधिकाऱ्यांना तंबी
गोट्यांसारखे घरंगळत जाऊ नका; राज ठाकरे यांची पदाधिकाऱ्यांना तंबी.
कावीळ झालेल्यांना जग पिवळं दिसतं, राज ठाकरेंचा राऊतांना टोला
कावीळ झालेल्यांना जग पिवळं दिसतं, राज ठाकरेंचा राऊतांना टोला.
पंकजा मुंडे यांना बीड कठिण?; संजय राऊत यांच्या 'त्या' विधानाने खळबळ
पंकजा मुंडे यांना बीड कठिण?; संजय राऊत यांच्या 'त्या' विधानाने खळबळ.