617 वर्षानंतर गोचर कुंडलीत ग्रहांचा मेळा, तीन शुभ राजयोगामुळे या राशींना मिळणार पाठबळ

| Updated on: Feb 20, 2023 | 6:11 PM

Astrology 2023 : ग्रहांच्या गोचरामुळे शुभ स्थिती निर्माण झाली आहे. गुरु, शुक्र, शनि आणि सूर्याच्या स्थितीमुळे तीन राजयोग तयार झाले आहे. या स्थितीचा फायदा चार राशींना होणार आहे.

617 वर्षानंतर गोचर कुंडलीत ग्रहांचा मेळा, तीन शुभ राजयोगामुळे या राशींना मिळणार पाठबळ
राशीमंडळात 617 वर्षानंतर ग्रहांची अशी स्थिती, तीन राशींना मिळणार राजयोगाचा फायदा
Follow us on

मुंबई : ग्रहांची स्थिती आणि नक्षत्र यावरून ज्योतिषशास्त्रात भाकित वर्तवलं जातं. प्रत्येक ग्रह आपल्या गतीनुसार एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. ग्रहांच्या या स्थितीमुळे शुभ अशुभ योग तयार होत असतात. कधी कधी मित्र ग्रहांसोबत युती, तर कधी शत्रुग्रहांसोबत युती होते. या स्थितीचा राशीमंडळावर फरक दिसून येतो आणि त्याचा परिणाम मानवी जीवन आणि पृथ्वीवर होतो. आजपासून 617 वर्षांपूर्वी ग्रहांची अशीच युती आघाडी झाली होती. सूर्य, गुरु, शुक्र आणि शनि यांच्या राशीचक्रातील स्थितीमुळे शश, मालव्य आणि हंस राजयोग तयार झाला आहे. या स्थितीचा परिणाम सर्वच राशींवर होत आहे. मात्र चार राशींवर याचा सकारात्मक परिणाम होत असून धनलाभाचीही स्थिती निर्माण झाली आहे. चला जाणून घेऊयात या चार राशी कोणत्या आहेत.

मिथुन : मीन राशीत गुरु आणि शुक्राची युती झाली आहे. यामुळे हंस आणि मालव्य राजयोग तयार झाला आहे.यामुळे या राशीच्या लोकांसाठी हा काळ अनुकूल असणार आहे. नोकरीची संधी या काळात चालून येईल. तसेच नोकरी करणाऱ्या जातकांना पदोन्नती मिळू शकते.त्याचबरोबर पगार वाढीची शक्यता देखील आहे. व्यवसायिकांना नवे करार करण्यासाठी हे वेळ योग्य ठरेल. गुंतवणुकीतून अपेक्षित फळ मिळू शकते.

कुंभ : शनिदेवंना कुंभ राशीच्या जातकांच्या कुंडलीत शश नावाचा राजयोग तयार केला आहे. यामुळे आर्थिक पाठबळ मिळणार आहे. तसेच अडकलेली कामं या काळात पूर्ण होतील. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल आणि नव्या योजना आखण्यास मदत होईल.जोडीदाराकडून चांगली साथ मिळेल तसेच कौटुंबिक वातावरण चांगलं राहील.

धनु : शुक्र ग्रहाने या राशीच्या चतुर्थ भावात मालव्य राजयोग तयार केला आहे. त्यात शुक्र ग्रह हा प्रसिद्धी आणि आर्थिक स्थितीचा ग्रह आहे. यामुळे नोकरी आणि करिअर चांगल्या संधी चालून येतील. नव्या नोकरीचा प्रस्ताव मिळाल्याने तु्म्हीही खूश व्हाल. नोकरी करत असलेल्या जातकांना पदोन्नती आणि पगारवाढ मिळू शकते. व्यवसायिकांना या काळात चांगलं फळ मिळेल.वाहन आणि प्रॉपर्टी खरेदी करण्यास ही वेळ उत्तम आहे.

कन्या : या राशीच्या जातकांच्या सप्तम भावात मालव्य राजयोग तयार होत आहे. हा सर्वात शुभ योग आहे. यामुळे जातकांची आर्थिक अडचण दूर होईल आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरी आणि व्यवसायिकांना या योगाचा विशेष फायदा होईल.करिअरमधील अडचणी चुटकीसरशी दूर होतील. सातवं स्थान जोडीदाराशी निगडीत असल्याने चांगली साथ मिळेल. तर जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)