Baba Vanga : पृथ्वीवरून माणसंही नष्ट होणार… बाबा वेंगा यांची सर्वात खतरनाक भविष्यवाणी; या 10 भाकितांमुळे जगाला टेन्शन

Baba Vanga : बाबा वेंगा त्यांच्या भविष्यवाणीसाठी जगभरात प्रसिद्ध आहेत. दुसरे महायुद्ध आणि चेरनोबिल आपत्ती यासारख्या जागतिक घटनांचे भाकीत त्यांनी केले. त्यांच्या अनेक भविष्यवाणी खऱ्या ठरल्या.

Baba Vanga : पृथ्वीवरून माणसंही नष्ट होणार... बाबा वेंगा यांची सर्वात खतरनाक भविष्यवाणी; या 10 भाकितांमुळे जगाला टेन्शन
बाबा वेंगांची सर्वात खतरनाक भविष्यवाणी
| Updated on: Mar 12, 2025 | 4:25 PM

Baba Vanga : बाबा वेंगा यांचे खरे नाव वांगेलिया पांडैवा गुश्तेरोवा होते. त्या लहानपणापासूनच अंध होती. त्यांनी आपले बहुतेक आयुष्य बल्गेरियातील बेलासिका पर्वतांच्या रुपाईट प्रदेशात व्यतीत केले. बाबा वेंगा यांचा जन्म 31 जानेवारी 1911 रोजी झाला आणि 11 ऑगस्ट 1996 रोजी त्यांचे निधन झाले. बालपणी त्यांच्या वडिलांना पहिल्या महायुद्धात बल्गेरियन सैन्यात भरती करण्यात आले, तर त्यांची आई लहान वयातच मरण पावली. यामुळे वेंगाला तरुणपणात शेजारी आणि जवळच्या कौटुंबिक मित्रांची मदत आणि त्यांनी दान केलेल्या वस्तूंवर अवलंबून राहावे लागले. दुसऱ्या महायुद्धात वेंगा यांची ख्याती झपाट्याने वाढली कारण त्यांची भविष्यवाणी खरी होऊ लागली. 11 ऑगस्ट 1996 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी केलेल्या मोठ्या भविष्यवाणीबद्दल जाणून घेऊया.

2025 मध्ये जगाच्या अंताची होणार सुरूवात

बाबा वेंगा यांच्या मते, 2025 मध्ये अशा घटना सुरू होतील, ज्यामुळे जगाचा अंत होईल. याचा अर्थ या वर्षापासून मोठ्या विध्वंसक घटना किंवा संघर्ष सुरू होऊ शकतात, ज्यामुळे मानवी इतिहास पूर्णपणे बदलू शकतो.

5079 पर्यंत मानवता अस्तित्वात राहील

जरी जगाच्या अंताची प्रक्रिया 2025 मध्ये सुरू होणार असली, परंतु बाबा वेंगाच्या मते, 5079 पर्यंत मानवता पूर्णपणे संपणार नाही. याचा अर्थ या प्रदीर्घ कालावधीत अनेक संघर्ष आणि आव्हाने असतील, पण कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मानवी सभ्यता टिकून राहील.

युरोपमध्ये मोठा संघर्ष

बाबा वेंगांच्या एका अंदाजानुसार, युरोपमध्ये मोठा संघर्ष होण्याची शक्यता आहे. हा खंड गंभीर राजकीय आणि सामाजिक उलथापालथीचा सामना करेल, ज्यामुळे मोठी अशांतता निर्माण होऊ शकते असं भाकीत त्यांनी केलं.

2043 पर्यंत यूरोपात मुस्लिम शासन

बाबा वेंगांच्या भविष्यवाणीनुसार 2043 पर्यंत युरोपमध्ये मुस्लिम राजवट प्रस्थापित होऊ शकते. लोकसंख्या आणि सांस्कृतिक बदलांमुळे मुस्लिम समाज युरोपमधील एक महत्त्वाची राजकीय शक्ती बनेल, असा त्यांचा विश्वास होता.

2076 पर्यंत कम्युनिस्ट राजवट येणार परत ?

बाबा वेंगा यांच्या भाकीतानुसार, 2076 पर्यंत जगात कम्युनिस्ट विचारसरणी पुन्हा प्रबळ होऊ शकते. हे सामूहिक शासनाकडे संभाव्य जागतिक बदलाचे संकेत देते. त्यांचे भाकीत लोकशाही प्रणाली आणि व्यक्तिस्वातंत्र्यासमोरील संभाव्य आव्हानांबद्दल चिंता व्यक्त करते.

5079 मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे होणार जगाचा अंत

बाबा वांगाच्या शेवटच्या भविष्यवाणीनुसार, 5079 मध्ये एक मोठी नैसर्गिक आपत्ती येईल, ज्यामुळे जगाचा अंत होईल. हे कोणत्याही मानवनिर्मित संकटामुळे होणार नसून निसर्गाची एक शक्तिशाली घटना असेल, ज्यामुळे मानवता पूर्णपणे नष्ट होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

या भविष्यावाणी झाल्या खऱ्या

सोव्हिएत युनियनचे विघटन (1991) – बाबा वेंगा यांनी सोव्हिएत युनियन (USSR) तुटण्याची भविष्यवाणी केली होती आणि ती 1991 मध्ये खरी ठरली.

9/11 दहशतवादी हल्ला (2001) – त्याने म्हटले होते की अमेरिकेवर स्टीलच्या दोन पक्ष्यांकडून हल्ला केला जाईल, ज्याचा संबंध वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील 9/11 हल्ल्याशी आहे.

त्सुनामी आणि भूकंप (2004) – त्यांनी 2004 मध्ये झालेल्या इंडोनेशिया आणि इतर आशियाई देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुनामी आणि भूकंप होण्याची भविष्यवाणी केली.

बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष बनले (2008) – बाबा वेंगा यांनी म्हटलं होतं की अमेरिकेचे पुढील राष्ट्राध्यक्ष आफ्रिकन वंशाचे असतील, जे खरे ठरले.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)