Aries/Taurus Rashifal Today 30 July 2021 | महत्वाच्या योजना अंमलात आणण्याची योग्य वेळ, योजना फलदायी ठरतील

| Updated on: Jul 30, 2021 | 1:50 AM

शुक्रवार 30 जुलै 2021 (Aries/Taurus Rashifal) प्रत्येकालाच आपला दिवस हा आनंदी आणि स्फुर्तीदायक असाव असे वाटते. आपल्या राशीतील गृहांची दिशा आणि दशा त्यासाठी महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे हा दिवस कोणासाठी चांगला असेल, कोणाला आनंदाची बातमी मिळेल, कोणाला आर्थिक लाभ होईल.

Aries/Taurus Rashifal Today 30 July 2021 | महत्वाच्या योजना अंमलात आणण्याची योग्य वेळ, योजना फलदायी ठरतील
mesh-vrishabh
Follow us on

डॉ. अजय भाम्बी –

मुंबई : शुक्रवार 30 जुलै 2021 (Aries/Taurus Rashifal) प्रत्येकालाच आपला दिवस हा आनंदी आणि स्फुर्तीदायक असाव असे वाटते. आपल्या राशीतील गृहांची दिशा आणि दशा त्यासाठी महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे हा दिवस कोणासाठी चांगला असेल, कोणाला आनंदाची बातमी मिळेल, कोणाला आर्थिक लाभ होईल. मेष आणि वृषभ राशीच्या लोकांनी या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरुन त्यांचा दिवस शुभ असेल. त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवल्याने आपण होणारे नुकसान टाळू शकता. आज आपण कोणत्या गोष्टींसाठी सावधगिरी बाळगली पाहिजे. या दिवशी कोणता रंग, कोणता क्रमांक आणि कोणते अक्षर तुमच्यासाठी शुभ असेल. जाणून घ्या शुक्रवारचं संपूर्ण राशीभविष्य (Aries/Taurus Daily Horoscope Of 30 July 2021 Mesh And Vrishabh Rashifal Today) –

मेष राश‍ी ( Aries), 30 जुलै

आज ग्रह संक्रमण फारच चांगले राहिले आहे. आपल्या महत्वाच्या योजना अंमलात आणण्याचीही योग्य वेळ आहे. मुलांच्या शिक्षणाशी संबंधित काही योजना फलदायी ठरतील. ज्यामुळे मुलांचा आत्मविश्वासही वाढेल.

परंतु पैशाशी संबंधित व्यवहार फार काळजीपूर्वक करा. कारण यामुळे काही गैरसमज उद्भवू शकतात. जर, आपण वाहन किंवा मालमत्तेशी संबंधित कर्ज घेण्याची योजना आखत असाल तर नक्कीच त्यावर पुनर्विचार करा.

व्यवसायात काही नवीन कामे सुरु होतील. परंतु जास्त नफा मिळण्याची अपेक्षा करु नका आणि कठोर परिश्रम करा. बाजारात तुमची प्रतिमा चांगली राहिली आहे. आपल्याला योग्य व्यावसायिक ऑर्डर देखील मिळू शकतात. आपली व्यवसायिक प्रणाली अधिक चांगल्या प्रकारे राखण्याची ही वेळ आहे.

लव्ह फोकस – एखाद्या विषयावरुन पती-पत्नीमध्ये लहान-मोठी भांडणं होतील. तुमच्या लाईफ पार्टनर किंवा लव्ह पार्टनरला चांगली भेट द्या.

खबरदारी – वाहन काळजीपूर्वक चालवा. कोणत्याही प्रकारच्या जोखीम घेण्यास टाळा.

लकी रंग – बदामी
लकी अक्षर- अ
फ्रेंडली नंबर- 9

वृषभ राश‍ी (Tauras), 30 जुलै

विशेष लोकांना भेटाल. विशेष विषयांवरही चर्चा केली जाईल. जे सर्वांसाठी फायद्याचे ठरेल. एखाद्या मालमत्तेची विक्री किंवा खरेदी करण्याची योजना आखत असल्यास परिस्थिती अनुकूल आहे.

आपल्या परिश्रमानुसार योग्य परिणाम मिळणार नाहीत. परंतु, तणाव घेऊ नका आणि शांतपणे आणि संयमाने वेळ घालवा. लवकरच परिस्थिती आपल्यासाठी अनुकूल असेल. शेजार्‍यांशी संबंधात सौहार्द कायम ठेवा. शंका आणि संशय स्वभावात निर्माण होऊ देऊ नका.

आपल्या वैयक्तिक समस्यांमुळे आपण व्यवसायाकडे जास्त लक्ष देऊ शकणार नाही. जर कोणत्याही नवीन कामाची योजना असेल तर आज त्यावरील कोणत्याही प्रकारची कारवाई पुढे ढकलली पाहिजे. शासकीय कामात जास्त प्रमाणात जादा ओव्हरटाईमसाठी ऑर्डर दिली जाऊ शकतात.

लव्ह फोकस – कौटुंबिक जीवन आनंदी राहील. विवाहबाह्य संबंधांपासून दूर रहा.

खबरदारी – घरातील कोणत्याही सदस्याच्या आरोग्याबाबत चिंता असेल. आपल्या आरोग्याची काळजी घेणे देखील महत्वाचे आहे.

भाग्याचा रंग – पिवळा
लकी अक्षर- श
फ्रेंडली नंबर- 3

Aries/Taurus Daily Horoscope Of 30 July 2021 Mesh And Vrishabh Rashifal Today

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Zodiac Signs | या दोन राशींचा विवाह म्हणजे रोज घरात वादाला आमंत्रण, शुभमंगल करताना व्हा सावधान

Zodiac Signs | या 5 राशीच्या व्यक्ती भावनिकरित्या असतात सर्वात मजबूत, जाणून घ्या तुमच्या राशीबाबात