Astrology 2023 : सूर्याच्या स्थितीमुळे तयार झाला महा दरिद्र योग, तीन राशीच्या जातकांना बसणार फटका

ज्योतिषशास्त्रात ग्रहांची स्थिती बरंच काही सांगून जाते. ठराविक कालावधीनंतर ग्रहांची स्थिती बदलली की, शुभ अशुभ योग तयार होतात. असा अशुभ सूर्याच्या गोचरामुळे तयार झाला आहे.

Astrology 2023 : सूर्याच्या स्थितीमुळे तयार झाला महा दरिद्र योग, तीन राशीच्या जातकांना बसणार फटका
Astrology 2023 : सूर्याचं कर्क राशीत बस्तान आणि तयार झाला महा दरिद्र योग, या राशींची डोकेदुखी वाढणार
| Updated on: Jul 31, 2023 | 4:33 PM

मुंबई : नवग्रहांमध्ये सूर्याला राजाचा मान दिला गेला आहे. सूर्य हा आत्मविश्वासाचा कारक ग्रह आहे. तसेच पृथ्वीतलावरील व्यक्तींचा थेट सूर्याशी संबंध येतो. त्यामुळे सूर्याचा प्रभाव जातकांवर लवकर होतो. सूर्यदेव सध्या कर्क राशीत असून आता महा दरिद्र योग तयार झाला आहे. जेव्हा शुभ ग्रह एखाद्या अशुभ ग्रहाच्या संपर्कात येतो तेव्हा हा योग तयार होतो. हा योग श्रीमंत व्यक्तींनाही भिकेला लावणारा असा अशुभ योग आहे. सूर्यदेव 17 ऑगस्ट 2023 पर्यंत कर्क राशीत असणार आहे. त्यानंतर सूर्य सिंह राशीत प्रवेश करेल. तत्पूर्वी या महा दरिद्र योगाच्या कोणत्या राशींना फटका बसेल ते जाणून घेऊयात.

या तीन राशीच्या जातकांना बसणार फटका

मिथुन : या राशीच्या जातकांनी महा दरिद्र योग काळात जपून राहणं गरजेचं आहे. कारण या राशीचा स्वामी ग्रह बुध असून राशीच्या केंद्र स्थानात कोणताही ग्रह नाही. त्यामुळे या राशीच्या जातकांना जबरदस्त फटका बसणार आहे. कामाच्या ठिकाणी सांभाळून राहावं लागेल. एखादी चूक चांगलीच महागात पडण्याची शक्यता आहे. आपल्या सहकार्यांसोबत प्रेमाने वागण्याचा प्रयत्न करा. आपल्याकडून चूक होईल असं अजिबात वागू नका.

कन्या : महा दरिद्रयोग या राशीसाठीही डोकेदुखी ठरू शकते. सूर्य चौथ्या स्थानाचा स्वामी असून रोग स्थानावर आहे. त्यामुळे या काळात आईच्या तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे. या काळात प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणं महागात पडू शकते. तसेच न्यायालयीन प्रकरणात फटका बसू शकतो. त्यामुळे भांडणं किंवा मोठ्या आर्थिक व्यवहारांपासून दूर राहणं गरजेचं आहे.

धनु : या राशीच्या विवाह आणि करिअरचा स्वामी सूर्यासोबत मृत्यू स्थानात सूर्यासोबत विराजमान आहे. तसेच केंद्र स्थानात कोणताच ग्रह नाही. यामुळे वडिलांच्या तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे. जोडीदाराचं आरोग्य खालावल्याने त्रास होण्याची शक्यता आहे. या काळात नवं काम सुरु करू नका. त्यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकतं.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)