AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology: बुद्धिमान, कल्पक आणि मोकळ्या मनाचे असतात ‘या’ राशीचे लोकं

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, कुंभ राशीला बुद्धिमान, साहसी आणि दूरदर्शी म्हणून ओळखले जाते. कुंभ राशीच्या चिन्हाखाली जन्मलेली व्यक्ती मोकळ्या मनाचे, स्वतंत्र आणि प्रेमळ असतात.

Astrology: बुद्धिमान, कल्पक आणि मोकळ्या मनाचे असतात 'या' राशीचे लोकं
जोतिषशास्त्र Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Aug 27, 2022 | 4:19 PM
Share

कुंभ (Aquarius) ही राशिचक्रातील 11वी राशी आहे. जेव्हा चंद्र धनिष्ठा, संपूर्ण शतभिषा आणि पूर्वभद्राच्या 2/3 भागातून जातो तेव्हा या नक्षत्रांत जन्मघेणाऱ्यांची रास कुंभ असते. कुंभ राशीचा स्वामी शनि आहे, त्यामुळे या राशीच्या लोकांवर शनि (Shani) ग्रहाचा विशेष प्रभाव असतो. या राशीचे लोकं शारीरिकदृष्ट्या सुस्त असतात परंतु वैचारिकदृष्ट्या खूप मजबूत असतात. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, कुंभ राशीला बुद्धिमान, साहसी आणि दूरदर्शी म्हणून ओळखले जाते. कुंभ राशीच्या चिन्हाखाली जन्मलेली व्यक्ती मोकळ्या मनाचे, स्वतंत्र आणि प्रेमळ असतात. शनि हा शनी हा न्यायदेवता म्हणून ओळखला जातो. यामुळे या राशीचे लोकं आयुष्याचा सुवर्णमध्य गाठण्यात यशस्वी ठरतात. कुंभ राशीच्या लोकांमध्ये आणखी कोणती वैशिष्ट्ये आढळतात ते जाणून घेऊया.

कुंभ राशीची वैशिष्ट्ये

कुंभ राशीच्या व्यक्ती या अधिकतम दिलदार स्वभावाच्या असतात. कंजुसी करणे या व्यक्तींना जमत नाही. प्रसिद्धी मिळविण्यासाठी हे लोकं मेहनत करतात. या राशीच्या लोकांमध्ये व्याव्हारिकपणा कमी असतो त्यामुळे पैशांची उधळपट्टी करतात. भावनाप्रधान असल्याने अनेकदा त्यांचा गैरफायदासुद्धा घेतला जातो.  त्यामुळे यांनी सहसा कोणावर पटकन विश्वास ठेऊ नये.

या राशीच्या लोकांकडे बुद्धी-विद्वत्ता असल्यामुळे त्यांचे बौध्दिक चर्चेमध्ये, बौध्दिक कामामध्ये मन रमते. त्यामुळे इतरांना सतत उपदेश करण्याची त्यांना सवय असते. या सवयीमुळे इतरांना कमी लेखण्याची सवय जडते. अहंकार वाढतो.

या राशीच्या लोकांचा आणखी एक स्वभाव म्हणजे यांचा आरामदायी जीवनाकडे कल असतो. त्यामुळे कष्ट करणे यांच्या जीवावर येते. जोवर अतितटीची वेळ येत नाही तोवर कष्ट करीत नाही. थोडक्यात काय तर हे लोकं तहान लागल्यावर विहीर खोदतात.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी