AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sadesati Upay: शनीची साडेसाती सुरू आहे? या उपायांनी मिळेल तुम्हाला त्वरित लाभ

ज्योतिष शास्त्रानुसार, न्यायाचे दैवत शनिदेव चांगली कर्म करणाऱ्यांना शुभ फल प्रदान करतात, तसंच वाईट कर्म करणाऱ्यांना शिक्षाही देतात. ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला न्यायदेवता म्हटलं जातं.

Sadesati Upay: शनीची साडेसाती सुरू आहे? या उपायांनी मिळेल तुम्हाला त्वरित लाभ
शनिदेव Image Credit source: Social Media
| Updated on: Aug 03, 2022 | 3:06 PM
Share

ज्योतिषशास्त्रानुसार शनीची साडेसाती (Sadesati Upay) एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यावर साडेसात वर्षे राहते. शनि सध्या मकर, धनु आणि कुंभ राशीत आहे. कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीच्या आधारे शनीची साडेसाती शुभ की अशुभ हे ठरवता येते. ज्योतिष शास्त्रानुसार कोणत्याही जातकाच्या कुंडलीत बलवान शनि व्यक्तीला लाभ देतो. दुसरीकडे, कमकुवत शनि एखाद्यासाठी विविध समस्या निर्माण करतो. अशा वेळी त्याचे वाईट परिणाम टाळण्यासाठी  नियमितपणे शनीचे काही उपाय केले जाऊ शकतात. ज्योतिष शास्त्रानुसार, न्यायाचे दैवत शनिदेव (Shanidev) चांगली कर्म करणाऱ्यांना शुभ फल प्रदान करतात, तसंच वाईट कर्म करणाऱ्यांना शिक्षाही देतात. ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला न्यायदेवता म्हटलं जातं. असं मानलं जातं की शनीची साडेसाती प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात तीनदा येते. ज्यामध्ये साडीसाती ही साडे सात वर्षांची असते. यात अडीच-अडीच वर्षांच्या तीन ढैय्या असता.

साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी उपाय

  1.  प्रत्येक शनिवारी विधीनुसार शनिदेवाची पूजा केल्यास शनिदेवाची कृपा प्राप्त होते.
  2. गरजूंना मदत करा, शनिशी संबंधित गोष्टी शक्यतो दान करा.
  3.  शनीला बळ देण्यासाठी उजव्या हाताच्या मधल्या बोटात लोखंडी अंगठी घाला. घराच्या दारावर घोड्याची नाल लावा
  4.  दर शनिवारी शनीला तांबे आणि तिळाचे तेल अर्पण करा.
  5.  शनिवारी शनि स्तोत्राचे पठण करा.
  6. शनिवारी  नियमितपणे कावळ्याला धान्य खाऊ घाला. मुंग्यांना मध किंवा साखर खाऊ घाला.
  7.  अपंग लोकांची शक्य तितकी सेवा करा.

शनी ग्रहासाठी काही उपाय

लक्षात ठेवा सूर्यास्तानंतर शनिदेवाची पूजा करणे अधिक फलदायी मानले जाते. त्यामुळे शनिदेवाची पूजा आणि शनी ग्रहाचे उपाय हे सूर्यास्तानंतरच करावेत, असा सल्लाही ज्योतिष शास्त्राच्या तज्ज्ञांनी दिला आहे कारण शनिदेवाची वेळ सूर्यास्तानंतरच सुरू होते. शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा. यानंतर शनिदेवाचे ध्यान करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. शक्य असल्यास शनिदेव ॐ शनिश्चराय नमः या मंत्राचा जप करावा.

एक वाटी मोहरीचे तेल घ्या. या तेलात आपली प्रतिमा पहा. त्यानंतर हे तेल कोणत्याही गरीब किंवा गरजू व्यक्तीला दान करा. तुम्हाला हवे असल्यास या तेलाचा दिवा लावून शनिदेवाच्या मंदिरात ठेवू शकता. असे केल्याने आरोग्यासही फायदे होतील.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.