Astrology : शुक्राचे राशी परिवर्तन, या तीन राशीच्या लोकांवर होणार लक्ष्मीची कृपा

या राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी चांगली बातमी मिळू शकते. नोकरीत बढतीची शक्यता आहे. याशिवाय, जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्यातही यश मिळेल. कुटुंब आणि पत्नीसोबत आनंदी वेळ घालवू शकाल. एखाद्या सहलीला किंवा देवदर्शनाला जाण्याचा बेत आखू शकता. 

Astrology : शुक्राचे राशी परिवर्तन, या तीन राशीच्या लोकांवर होणार लक्ष्मीची कृपा
शुक्र राशी परिवर्तन
Image Credit source: Social Media
| Edited By: | Updated on: Feb 09, 2024 | 6:59 PM

मुंबई : शुक्र हा ऐश्वर्य, सुख आणि संपत्तीचा कारक ग्रह मानला जातो. नऊ ग्रहांमध्ये शुक्राचे स्वतःचे स्थान आहे. ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology) ज्यांच्या पत्रिकेत शुक्र मजबूत स्थितीत असतो त्यांच्यावर देवी लक्ष्मीची कृपा असते आणि धन आणि समृद्धीची कधीही कमतरता नसते. सुखाचा ग्रह शुक्र आता आपली राशी बदलणार आहे. ज्योतिषी पराग कुळकर्णी यांनी सांगितले की 18 जानेवारी 2024 रोजी शुक्र वृश्चिक सोडून धनु राशीत प्रवेश करेल. पंचागानुसार 18 जानेवारी रोजी रात्री 8:55 वाजता शुक्र धनु राशीत प्रवेश करेल. तर शुक्र 12 फेब्रुवारीपर्यंत या राशीत प्रवेश करेल, त्यानंतर तो मकर राशीत प्रवेश करेल. शुक्र धनु राशीत आल्याने त्याचा थेट परिणाम 12 राशींवर होईल, पण 3 राशीच्या लोकांसाठी हा काळ सुवर्णसंधीपेक्षा कमी नाही. चला जाणून घेऊया त्या तीन राशींबद्दल.

या राशींसाठी असेल सुवर्णकाळ

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी 24 दिवसांचा काळ खूप शुभ राहील. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील. त्याचबरोबर आर्थिक समस्या दूर झाल्यामुळे मानसिक शांतता राहील. याशिवाय तुम्हाला घरच्यांकडूनही पूर्ण सहकार्य मिळेल आणि घरात समृद्धी येईल. वाहन खरेदीचा योग जुळून येतोय.

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होईल. यावेळी तुम्हाला मित्र किंवा ओळखीच्या व्यक्तीची मदत मिळेल, ज्यामुळे तुमच्या करिअरमध्ये नवीन मार्ग उघडेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठीही हा काळ शुभ राहील. परदेशवारी होण्याची शक्यता आहे.

कन्या

कन्या राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी चांगली बातमी मिळू शकते. नोकरीत बढतीची शक्यता आहे. याशिवाय, जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्यातही यश मिळेल. कुटुंब आणि पत्नीसोबत आनंदी वेळ घालवू शकाल. एखाद्या सहलीला किंवा देवदर्शनाला जाण्याचा बेत आखू शकता.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)