
जगात अनेक भविष्यवेत्ते होऊन गेले. त्यातील अनेक जण त्यांनी वर्तवलेल्या भाकीतांमुळे जगप्रसिद्ध आहेत. यामध्ये बाबा वेंगा यांचा देखील समावेश होतो. बाबा वेंगा यांनी आपल्या हयातीमध्ये शेकडो वर्षांनंतर जगात कोणत्या घटना घडतील याचं भविष्य वर्तवलं आहे. काही जणांकडून असा दावा देखील केला जातो की बाबा वेंगा यांनी वर्तवलेल्या काही घटना या खऱ्या ठरल्या आहेत. ज्यामध्ये अमेरिकेवर झालेला हल्ला, तसेच हिटलरचा मृत्यू अशा काही घटनांचा समावेश आहे.दरम्यान बाबा वेंगा या एका वादळात सापडल्या होत्या, वादळात सापडल्यामुळे त्यांनी आपली दृष्टी गमावली त्यानंतर त्यांना दिव्य दृष्टी प्राप्त झाल्याचा दावा देखील केला जातो. बाबा वेंगा यांना बाल्कनचा नॅस्ट्रोडॅमस असं देखील म्हटलं जातं. त्यांचा जन्म बल्गेरियामध्ये झाला.
दरम्यान बाबा वेंगा यांनी आपल्या हयातीमध्ये काही राजकीय भाकीतं देखील केली आहेत. 2076 पर्यंत पुन्हा एकदा संपूर्ण जगावर कम्युनिस्टांची राजवट येईल असं भाकीत बाबा वेंगा यांनी वर्तवलं आहे.2076 पर्यंत जागतिक राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळेल.जगभरात हळूहळू साम्यवाद आणि समाजवादाचा प्रभाव वाढेल. एक दिवस असा येईल की त्यावेळी संपूर्ण जगावर कम्युनिस्टांचं राज्य असेल असं बाबा वेंगा यांनी म्हटलं आहे. जेव्हा जगात कम्युनिस्टांची सत्ता येईल तेव्हा भांडवलशाही दूर होऊन समानता वाढेल असंही बाबा वेंगा यांनी म्हटलं आहे.
बाबा वेंगा यांनी 2025 या वर्षाबद्दल देखील मोठं भाकीत वर्तवलं आहे. या वर्षामध्ये जगावर अनेक संकटं येतील, महापूर, भूकंप आणि युद्धा सारख्या संकटांचा सामना करावा लागले, पूर्वेकडी देशांमध्ये युद्ध होतील परंतु त्याचा परिणाम हा पश्चिमेकडील देशांवर देखील होऊ शकतो. तसेच महापुरासारखे संकट देखील या काळात येतील. अनेक ठिकाणी महाप्रलयंकारी भूकंप होतील अशी भविष्यवाणी बाबा वेंगा यांनी 2025 बद्दल केली आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)