
बाबा वेंगा या एक जगप्रसिद्ध भविष्यवेत्त्या होत्या, त्यांनी आपल्या हयातीमध्ये अनेक महत्त्वाच्या घटनांबद्दल भविष्यवाणी केली, त्यातील अनेक भाकीतं खरी ठरल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येतो. बाबा वेंगा यांचा जन्म बग्लेरियामध्ये 1911 मध्ये झाला तर त्यांचा मृत्यू 1996 साली झाला. त्यांनी आपल्या हयातीमध्ये हिटलरचा मृत्यू, इंग्लडंच्या महाराणीचा मृत्यू, जपानमध्ये आलेली त्सुनामी, अमेरिकेवर झालेला हल्ला अशा अनेक जगप्रसिद्ध घटनांबद्दल भाकीत केलं होतं, ही भाकीतं खरी ठरल्याचा दावा करण्यात येतो.
कोण होत्या बाबा वेंगा?
बाबा वेंगा या एक बल्गेरीयन भविषवेत्त्या होत्या, त्यांचा जन्म 1911 साली झाला. त्यांच्यासंदर्भात अशी देखील एक मान्यता आहे की, त्या लहान असताना एका वादळात सापडल्या, वादळात सापडल्यामुळे त्यांनी आपली दोन्ही डोळ्यांची दृष्टी गमावली. त्यांनी आपली दृष्टी गमावल्यानंतर त्यांना दिव्य दृष्टीची प्राप्ती झाली, त्यानंतर त्यांनी पुढच्या काळात जगात घडणाऱ्या अनेक गोष्टींबाबत भाकीत केलं. त्यातील काही गोष्टी खऱ्या ठरल्याचा दावा केला जातो.
दरम्यान बाबा वेंगा यांनी 2025 बाबत देखील मोठं भाकीत केलं आहे. 2025 मध्ये जगाच्या अंताला सुरुवात होईल असं त्यांनी म्हटलं होतं. 2025 साली अनेक मोठे भूकंप येतील, युद्ध होतील, काही देशांमध्ये महापूर येतील असंही त्यांनी म्हटलं होतं. 2025 च्या सुरुवातीलाच काही देशांना भूकंपाचे मोठे हादरे बसल्यानं बाबा वेंगा यांचं हे भाकीत देखील खरं ठरल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून करण्यात आला.
मात्र या व्यतिरिक्त देखील बाबा वेंगा यांनी 2025 बाबत आणखी एक मोठी भविष्यवाणी केली होती, ती म्हणजे जगावर एक मोठी अपत्ती येणार असल्याचं भाकीत त्यांनी वर्तवलं आहे. मात्र ही मोठी अपत्ती नेमकी काय असणार याबाबत त्यांनी आपल्या भविष्यवाणीमध्ये कोणतीही स्पष्टता केलेली नाही, त्यामुळे बाबा वेंगा यांच्या या भाकीताचे आता अनेक अंदाज लावले जात आहेत.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)