
मिडल इस्टमध्ये गेल्या काही वर्षांपासून अनेक आघाड्यांवर युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत इस्रायल प्रत्येक युद्धात उडी घेताना दिसत आहे. आता इस्रायलने सीरियाची राजधानी दमास्कसवर हवाई हल्ला केला आहे. इस्रायल आणि सीरिया यांच्यातील या तणावामुळे बाबा वेंगाची एक भविष्यवाणी खरी ठरत असल्याचं दिसत आहे.
बल्गेरियाची दृष्टिहीन भविष्यवक्त्या आणि रहस्यवादी बाबा वेंगाच्या भविष्यवाण्यांनुसार, सीरियाच्या नाशानंतर तिसरं जागतिक युद्ध सुरू होईल. १९९६ मध्ये बाबा वेंगाचा मृत्यू झाला होता. मृत्यूपूर्वी त्यांनी ५०७९ पर्यंतच्या भविष्यवाण्या केल्या होत्या, ज्यात जगाच्या अंताचाही समावेश आहे.
सीरियासंदर्भातील भविष्यवाणी खरी ठरली
सीरियाबाबत त्यांनी भविष्यवाणी केली होती की, सीरियाचा पतन हा जागतिक संघर्षाचं कारण ठरेल. सीरियाच्या विध्वंसानंतर पाश्चिमात्य आणि पूर्वेकडील देशांमध्ये युद्ध सुरू होईल. नुकतंच इस्रायलने सीरियाची राजधानी दमास्कसवर हवाई हल्ला केला, त्यानंतर तिथे तणावाचं वातावरण आहे. इस्रायल-सीरिया संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर बाबा वेंगाची भविष्यवाणी चर्चेत आली आहे. जर त्यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या, तर येत्या काळात सीरियाला मोठ्या प्रमाणावर विध्वंसाला सामोरं जावं लागू शकतं. यामुळे तिसरं जागतिक युद्ध सुरू होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.
बाबा वेंगा कोण होत्या?
बाबा वेंगा या बल्गेरियाच्या रहिवासी आणि दृष्टिहीन भविष्यवक्त्या होत्या. त्यांनी आपल्या मृत्यूपूर्वी ५०७९ पर्यंतच्या भविष्यवाण्या केल्या होत्या. त्यांच्या भविष्यवाण्यांना कोणताही वैज्ञानिक आधार नाही. तरीही, त्यांच्या अनुयायांचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. बाबा वेंगाच्या खऱ्या ठरलेल्या भविष्यवाण्यांमध्ये सोव्हिएत संघाचं विघटन, ९/११ चा दहशतवादी हल्ला, २००४ ची त्सुनामी, बराक ओबामाचं अमेरिकेचं राष्ट्राध्यक्षपद आणि सीरियातील गृहयुद्ध तसेच युरोपमधील संकट यांचा समावेश आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)