
भविष्य पुराण हे हिंदू धर्मामध्ये असलेल्या 18 पुराणांपैकी एक आहे. या पुराणाच्या नावावरूनच हे स्पष्ट होतं की, येणाऱ्या काळात काय घटना घडणार आहेत? यांचे संकेत या पुराणामध्ये देण्यात आले आहेत. भविष्य पुराणामध्ये जगामध्ये घडणाऱ्या काही महत्त्वपूर्ण घटनांचा उल्लेख करण्यात आला आहे. भविष्य पुराणामध्ये केवळ येणाऱ्या काळातील भाकीतंच वर्तवण्यात आलेली नाहीयेत तर त्यामध्ये धर्म, दान, ज्योतिष, व्रत, उपवास विविध पूजांचे विधी आणि नैतिक सिद्धांत यांची देखील माहिती देण्यात आली आहे. असं म्हणतात हजारो वर्षांपूर्वी माणसांचे स्वभाव, धर्म, निसर्गात घडत असलेल्या घटना, राजकीय आणि आर्थिक स्थित्यंतर या आधारावर भविष्यात काय घटना घडणार आहेत, यासंदर्भातील अनेक भाकीतं भविष्य पुराणामध्ये करण्यात आले आहेत.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे आज जगात ज्या घटना घडत आहेत, त्यातील अनेक घटना या भविष्य पुराणामध्ये करण्यात आलेल्या भाकिताशी मिळत्या-जुळत्या आहेत. भविष्य पुराणामध्ये प्रदूषण, दोन देशांमध्ये वाढत असलेले तणाव, युद्ध, नौसर्गिक संकट अशा विविध घटनांचा त्यामध्ये समावेश आहे. भविष्य पुराणामध्ये म्हटलं आहे की कलियुगात आर्थिक व्यवस्था ही अत्यंत खराब असेल, सरकार राजकीय फायद्यांसाठी काही विशिष्ट वर्गावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करेल. अशा स्थितीमध्ये लोक शहरी जीवन सोडून शांतीच्या शोधात दूर जंगलांमध्ये राहायला जातील, असं भाकीत भविष्य पुराणामध्ये वर्तवण्यात आलं आहे.
दरम्यान पुढे भविष्य पुराणामध्ये असं म्हटलं आहे की, एवढा भयंकर दुष्काळ पडेल की अन्न-धान्य उपलब्ध न झाल्यानं लोकांवर झाड पाला आणि जंगलातील कंदमुळे खाण्याची वेळ येईल. ताण -तणाव एवढा वाढेल की, अनेक आजार त्यामुळे निर्माण होतील. लोकांचं आयुष्य सरासरी 30 ते 40 वर्षांपर्यंत मर्यादीत होईल. दरम्यान जग अस्थित होईल, देशा देशांमध्ये संघर्ष वाढत जातील आणि भीषण युद्ध होईल असं भाकीत देखील भविष्य पुराणामध्ये वर्तवण्यात आलं आहे. दरम्यान सध्या जगभरात ज्या घटना सुरू आहेत, त्या भविष्य पुराणाशी मिळत्या जुळत्या असल्याचं दिसून येत आहे.