30 वर्षानंतर कुंभ राशीत शनि-बुध ग्रहांचा मिलाफ, सहा राशींच्या स्वभावात दिसेल असा बदल

| Updated on: Feb 27, 2023 | 3:09 PM

बुध आणि शनि ग्रहांची 30 वर्षांनतर कुंभ राशीत युती झाली आहे. शनि आणि बुध हे मित्र ग्रह असल्याने त्याचा मानवी जीवनावर सकारात्मक फरक दिसून येईल. बुध हा ग्रह स्वभावाने राजकुमार आहे. म्हणजे जातकांचा राजशाही थाट दिसून येतो.

30 वर्षानंतर कुंभ राशीत शनि-बुध ग्रहांचा मिलाफ, सहा राशींच्या स्वभावात दिसेल असा बदल
बुध गोचर
Follow us on

मुंबई : ज्योतिषशास्त्र पूर्णपणे ग्रहांच्या स्थितीवर अवलंबून आहे. त्यामुळे ग्रहांचा स्वभाव आणि राशी तत्त्व यानुसार फळं मिळत असतात. ग्रह गोचरांचा सर्वसमावेश कमी अधिक प्रमाणात प्रभाव पडत असतो. शनि ग्रहाचा प्रभाव दीर्घ काळासाठी, तर चंद्राचा प्रभाव हा थोड्या काळावधीसाठी असतो. त्यात कोणत्या ग्रहाचं कोणत्या ग्रहासोबत पटतं हे पण पाहिलं जातं. अर्थात जशी संगत तसं फळ मिळतं असं बोलायला हरकत नाही. बुध आणि शनि ग्रहांची 30 वर्षांनतर कुंभ राशीत युती झाली आहे. शनि आणि बुध हे मित्र ग्रह असल्याने त्याचा मानवी जीवनावर सकारात्मक फरक दिसून येईल. बुध हा ग्रह स्वभावाने राजकुमार आहे. म्हणजे जातकांचा राजशाही थाट दिसून येतो. बुध ग्रह जर शत्रु ग्रहासोबत आला तर निश्चितच त्याची फलश्रूती नकारात्मक असते.त्यात शनिसोबत मित्रता असल्याने न्यायदेवता शनिकडून थोडा दिलासा मिळणार आहे.

27 फेब्रुवारी 2023 ला संध्याकाळी 6 वाजून 33 मिनिटांनी मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश केला आहे. शनि न्यायदेवता आणि मनाने चतूर आहेत.त्यामुळे या काळात अहंकार दूर होईल. याचा प्रभाव वैवाहिक जीवनावर नक्कीच पडेल. शनि आणि बुधाच्या युतीमुळे जातकांना साहित्य, लेखनात प्रगती दिसून येईल. एकांत स्थानी फिरायला या काळात आवडेल. पण आर्थिक स्थितीबाबत मनात कल्लोळ निर्माण होईल.

या राशींना होणार फायदा आणि अशी घ्याल काळजी

मेष : तुमची आर्थिक प्रगती या काळात व्यवस्थित राहील. तसेच उत्पन्नात वाढ देखील होईल. व्यवसायासाठी हा काळ उत्तम राहील. नव्या गुंतवणुकीतून तुम्हाला लाभ मिळेल. असं असलं तरी नातेसंबंधात तणाव दिसून येईल. त्यामुळे विनाकारण कोणत्याही वादात पडू नका.

वृषभ : सरकारी नोकरी करणाऱ्यांना या काळात विशेष लाभ मिळेल. जे लोक व्यवसायाशी निगडीत आहे त्यांच्यासाठी हा काळ उत्तम असेल. नवीन करार निश्चित होतील आणि मान-सन्मान मिळेल.

मिथुन : नोकरीत बदल होईल अशी दाट शक्यता आहे. शेअर बाजारातील गुंतवणुकीतून लाभ मिळेल. प्रवासाचा योग जुळून येईल. त्यामुळे निश्चितच लाभ होईल. आई वडिलांची या काळात साथ मिळेल. तसेच मित्रांचं पूर्ण सहकार्य मिळेल.

कन्या : कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होईल. तसेच केलेले करार तडीस जाण्यास योग्य काळ आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल.

तूळ : आर्थिक स्थिती या काळात स्थिर असेल. मान सन्मान या काळात वाढेल. नोकरीत पदोन्नती होण्याची दाट शक्यता आहे. कुटुंबाकडून चांगली साथ मिळेल. उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील.

मकर : तुम्हाला या काळात पैशांची अडचण भासणार नाही. पण खर्चावर नियंत्रण ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्ही ज्या कामात हात घालाल त्या कामात निश्चितच यश मिळेल. कौटुंबिक वादापासून दूर राहा. या काळात तब्येतीकडे लक्ष द्याल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)